संग्रामपूर : वान नदीपात्रात बुडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी तालुक्यातील काकनवाडा येथे घडली. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील ग्राम कोठा येथील शुभम राजेश अहेरकर या युवकाचा वान नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल दांडगे तर्फे कक्षसेवक आकाश चौरपगार यांच्या फिर्यादीवरून तामगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास प्रमोद मुळे करीत आहेत.