Headlines

कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून 37 वर्षीय युवकाची आत्महत्या! मोताळा तालुक्यातील कोल्ही गवळी येथील घटना

मोताळा :- कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून 37 वर्षीय शेतकऱ्यांने आत्महत्या केल्याची घटना आज दि.21 ऑगस्ट रोजी स्वतःच्या शेतात एक वाजेच्या सुमारास घडली. सदर शेतकऱ्यांची आई शेतात गेल्यानंतर ही बाब उघडकीस आली.( साहेबराव शामराव बोराडे वय 37 वर्ष ) रा.कोल्ही गवळी असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सदर शेतकरी हा कोल्ही गवळी येथे परिवारासह वास्तव्यास होते. नेहमीप्रमाणे ते आज शेतात गेले होते. त्यानंतर त्यांची आई एक वाजेच्या सुमारास शेताकडे गेली तेव्हा त्यांना मुलगा साहेबराव हा शेतात खाली पडलेला दिसला. मुलाच्या तोंडातून फेस निघालेला दिसल्याने मुलाने विषारी औषध प्राशन केल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबतची माहिती मिळताच नातेवाईकांनी त्यांना मलकापूर येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. सदर शेतकऱ्याला दोन मुलं होते, वडिलांनी टोकाचे पाऊल उचलल्याने मुलांचे पितृछत्र हरवले आहे. वृत्तलिहेपर्यंत पोलिसात नोंद घेण्याचे काम सुरू होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *