लोणावळ्यात फिरताना दरीत कोसळून मेहकरच्या तरुणाचा मृत्यू!
मेहकर :- लोणावळा येथील पर्यटनस्थळी घडलेल्या दुर्दैवी अपघातात मेहकर येथील प्रसिद्ध व्याख्याते प्रा. वसंत गिरी यांचे सुपुत्र प्रज्वल वसंत गिरी (वय २६) यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडल्याने मेहकर शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. प्रज्वल गिरी हा पुणे येथे बी.एड.चे शिक्षण घेत असून त्याचबरोबर एम.पी.एस.सी. परीक्षेची तयारी…
