पीएच.डी. पदवीने विज्ञान महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा; डॉ. पूनम इंगळे यांचे शैक्षणिक यश
मलकापूर :- विज्ञान महाविद्यालय, मलकापूर येथील संगणकशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ. सौ. पूनम महेश इंगळे यांना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठामार्फत संगणकशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील प्रतिष्ठेत भर पडली आहे. डॉ. इंगळे यांनी संगणकशास्त्र विषयात सखोल संशोधन करून ही सर्वोच्च शैक्षणिक पदवी प्राप्त केली….
