बांगलादेशच्या घटनेच्या निषेधार्थ मलकापुरात कडकडीत बंद, हिंदू संघटनांच्या बंदच्या आवाहनाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद!
मलकापूर ( उमेश इटणारे ):- बांगलादेशमध्ये माजलेल्या आराजकतेनंतर झालेल्या हिंसाचारात हिंदू अल्पसंख्यांकांच्या घरात लुटमार,तोडफोड,आणि जाळपोळीचा घटना घडल्या आहेत. तेथील झालेल्या घटनेत हिंदूंच्या अत्याचार प्रकरणी देशभरातील विविध हिंदू संघटना पेटून उठल्या आहेत. या घटनेचे पडसाद बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा पाहायला मिळत आहे. आज दि. 20 रोजी बुलढाणा बंद करण्याचे आवाहन विविध हिंदू संघटनांकडून व हिंदू समाज बांधवांकडून…
