घरचे पाहून थकले, नंतर विहिरीत आढळला 40 वर्षीय महिलेचा मृतदेह, भालेगाव बाजार येथील घटना!
भालेगाव बाजार: भालेगाव बाजार येथील ४० वर्षीय विवाहिता सुनीता राजेश हुरसाड ही ११ सप्टेंबर रोजी संध्याकाळी घरातून निघून गेली होती, त्यानंतर गुरुवारी सकाळी ९ वाजता त्या महिलेचा मृतदेह गावशिवारातील विहिरीत आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. प्राप्त माहितीनुसार, बुधवारी गावात बऱ्याच ठिकाणी महालक्ष्मीचा महाप्रसाद व इतर धार्मिक कार्यक्रम असल्यामुळे विवाहिता एखाद्या धार्मिक…
