पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘संस्थेची स्वायत्तता’ विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
मलकापूर, – पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या (आयक्यूएसी) वतीने २८ सप्टेंबर २०२४ रोजी “संस्थेची स्वायत्तता” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचा उद्देश महाविद्यालयातील प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना संस्थात्मक स्वायत्ततेचे महत्त्व समजावून देणे आणि त्यांचे ज्ञान वृद्धिंगत करणे हा होता. कार्यशाळेत प्राध्यापकांना वैयक्तिक आणि व्यावसायिक…
