मोताळ्यातील सुनिल कोल्हे हल्ला प्रकरणात तिघांना न्यायालयीन कोठडी!

मोताळा :- तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे तालुकाध्यक्ष सुनील कोल्हे यांच्यावर २५ नोव्हेंबर रोजी पाच जणांनी प्राणघातक हल्ला केला होता. या प्रकरणात पोलिसांनी रवी आव्हाड, विक्की अव्हाड, आणि अमोल अंभोरे यांना अटक करून १९ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.हल्ल्यात लोखंडी रॉडचा वापर करण्यात आला होता. पोलिसांनी तपासादरम्यान…

Read More

बिबट्याच्या हल्लात शेतकरी गंभीर जखमी, आरडाओरड केल्याने शेतकऱ्याचा जीव वाचला; मोताळा तालुक्यातील घटना!

  मोताळा :- तालुक्यातील रोहिणखेड शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात ३२ वर्षीय शेतकरी जखमी झाल्याची घटना सोमवारी, १६ डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. जखमी शेतकऱ्याला तातडीने जिल्हा रुग्णालय, बुलढाणा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.रवि रमेश निंबोळकर (वय ३२) हे सकाळी शेतात जाण्यासाठी दुचाकीने गट क्र. २४१ दाभा रस्त्याने जात असताना अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला…

Read More

अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने महसूल पथकाला केली धक्काबुक्की; बोरखेडी पोलिसात गुन्हा दाखल!

मोताळा :- येथील शिवारात १० डिसेंबर रोजी अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकाला एक ट्रॅक्टर चालक धक्काबुक्की करून ट्रॅक्टर घेऊन पलायन झाला. संबंधित ट्रॅक्टर चालकाने महसूल पथकाला परवाना न दाखवता वाळूची वाहतूक करताना पकडले गेले, परंतु त्याने कारवाईला विरोध करत महसूल पथकावर शारीरिक हल्ला केला. या प्रकरणी बोराखेडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

Read More

डिडोळा बु येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी राज्यस्तरीय स्काऊट शिबिरासाठी पात्र

डिडोळा, मोताळा: महाराष्ट्र शासनांतर्गत भारत स्काऊट राज्यस्तरीय राज्य पुरस्कार चाचणी शिबिराचे आयोजन 2 ते 5 डिसेंबर 2024 या कालावधीत संभाजीनगर येथे करण्यात आले. या शिबिरात सहा जिल्ह्यांतील 140 स्काऊट विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून बुलढाणा जिल्ह्यातून 33 विद्यार्थी सहभागी झाले.डिडोळा बु येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांनी या शिबिरासाठी पात्रता मिळवली. सम्राट सुधाकर गाडेकर, रितेश भगवान…

Read More

अवैध गुटख्याची वाहतूक करणारे पिकअप वाहन पकडले, ३६.८२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त; बोराखेडी पोलिसांची कारवाई!

मोताळा : महिंद्रा बोलेरो पिकअप क्र. एम एच २८ बीबी ७४९१ हा संशयित वाहन खामगाववरून मोताळा येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर बोराखेडी पोलिसांनी तातडीने नाकाबंदी केली. पोलिसांनी बोराखेडी फाटा येथे वाहन थांबवून त्याची तपासणी केली असता, वाहनामध्ये महाराष्ट्र राज्य शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा आढळून आला.या कारवाईत २५,८२,००० रुपये किमतीचा गुटखा आणि पिकअप वाहनाची किमत ११,००,००० रुपये…

Read More

पिं. देवी ते धा. बढे रोडवर दुर्दैवी अपघात: ४५ वर्षीय महिला ठार, युवक जखमी

मोताळा: तालुक्यातील पिं. देवी ते धा. बढे रोडवर १९ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास क्रुझर व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील ४५ वर्षीय अलका जाधव यांचा जागीच मृत्यू झाला, तर २० वर्षीय अश्वीन चव्हाण गंभीर जखमी झाला. माहितीनुसार, पिंपळगाव देवी येथून अश्वीन चव्हाण त्याच्या मावशी अलका जाधव यांना घेऊन हनवतखेड कडे जात…

Read More

दोन दुचाकींची समोरासमोर धडक, एकाचा मृत्यू एक गंभीर जखमी, बोराखेडी वडगाव रस्त्यावरील घटना!

मोताळा:- बुलडाणा जिल्ह्यात बोराखेडी-वडगाव रस्त्यावर झालेल्या दुचाकींच्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना २ नोव्हेंबर रोजी पुन्हई फाट्याजवळ घडली. डिडोळा येथील रहिवासी सचिन खंडागळे (वय २७) हे त्यांच्या दुचाकीवरून (क्रमांक : एमएच २८ बीआर ५६९८) सायंकाळी ५.३० वाजता वडगावकडे जात असताना हा अपघात झाला. त्याचवेळी मोताळा गावातील प्रभाकर…

Read More

मोताळ्यात 23 वर्षीय युवकाकडून देशी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त!

मोताळा : विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना तालुक्यात एका युवकाकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. रोहीणखेड शिवारातील या कारवाईत आरोपी शेख अरबाज शेख महमूद (वय २३, रा. इकबाल नगर, बुलडाणा) याला पोलिसांनी अटक केली आहे. घटनेचा तपशील असा की, बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार दीपक लेकुरवाळे आणि त्यांचे सहकारी…

Read More

दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात टॅक्टर उलटले; चालक जखमी, आव्हा परिसरातील घटना!

मोताळा : काल ३० ऑक्टोबर रोजी दहिगाव आव्हा परिसरात ट्रॅक्टर अपघात झाला. ट्रॅक्टर चालक शुभम घोंगटे यांनी समोरून आलेल्या दुचाकीला वाचविण्यासाठी ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला घेतला, पण गवतामध्ये खड्ड्यात गेल्याने ट्रॅक्टर उलटण्यापासून थोडक्यात वाचला. यात घोंगटे किरकोळ जखमी झाले. या रस्त्याच्या देखभालीची जबाबदारी संबंधित कंत्राटदारावर असल्याने ग्रामस्थांनी रस्त्यालगतचे गवत काढण्याची आणि मुरुम टाकून भरावाची मागणी केली…

Read More

शिवण क्लासला जाते म्हणून घरी परतलीच नाही, 19 वर्षीय तरुणी बेपत्ता ; मोताळा तालुक्यातील घटना!

मोताळाः शिवण क्लासला जाते असे सांगून तालुक्यातील चिंचपूर येथील १९ वर्षीय युवती घरून निघून गेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी मिसींग दाखल केली आहे.चिंचपूर येथील पदमाकर दिनकर बावस्कार यांनी बोराखेडी पोलिसात फिर्याद दिली की, त्यांची मुलगी मयुरी पदमाकर बावस्कार (वय १९) ही १८ ऑक्टोबर रोजी शिवण क्लासला जाते, असे सांगून घरुन निघून गेली. ती…

Read More
error: Content is protected !!