कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल.. मोताळा तालुक्यातील घटना

  मोताळा :- तालुक्यातील पान्हेरा (खेडी) येथील रामेश्वर विश्वनाथ राहणे या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. रामेश्वर राहणे यांची सहा एकर शेती गट क्रमांक १९८ व १९९ मध्ये आहे. मात्र, नापिकी आणि अतिवृष्टीमुळे शेतीचा खर्चही न निघाल्याने त्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. त्यांच्यावर भारतीय स्टेट बँक, को-ऑपरेटिव्ह बँक आणि…

Read More

दरोडेखोरांचा हैदोस; पशुवैद्यकीय डॉक्टरच्या पत्नीचा खून, डॉक्टर गंभीर जखमी, मोताळा तालुक्यातील दाभाडी येथील घटना!

  मोताळा :- तालुक्यातील दाभाडी येथे आज, १९ जानेवारी रोजी पहाटे दरोडेखोरांनी पशुवैद्यकीय डॉक्टर गजानन टेकाळे यांच्या घरी दरोडा टाकत त्यांची पत्नी माधुरी टेकाळे यांची क्रूरपणे हत्या केली. या घटनेत गजानन टेकाळे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर तातडीने रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास टेकाळे दाम्पत्याच्या घरात दरोडेखोरांनी प्रवेश करून मालमत्तेची लूट सुरू केली. विरोध…

Read More

मजुराचा पाण्यात पडून मृत्यू, मोताळा तालुक्यातील पिंपळगाव देवी येथील घटना!

मोताळा :- तालुक्यातील पिंपळगाव देवी येथे एका मजुराचा पाण्यात पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मृत मजुराचे नाव गणपत जगन भोई (वय ४५) असून, तो बऱ्हाणपूर जिल्ह्यातील मांजरोद येथील रहिवासी होता. पिंपळगाव देवी यात्रेत अनिल भोई (रा. बोदवड) यांच्या दुकानात गणपत भोई काम करीत होता. मात्र, दारुचे व्यसन असल्यामुळे तो १४ जानेवारी रोजी…

Read More

गव्हाला पाणी देताना रानडुकरांचा हल्ला; शेतकरी गंभीर जखमी, मोताळा तालुक्यातील घटना!

  मोताळा :- शेतात गव्हाला पाणी देत असताना अचानक रानडुकराने हल्ला केल्यामुळे शेतकरी जखमी झाल्याची घटना कोथळी शिवारात घडली. जखमी हमीदखाँ समशेरखॉ (४६) यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटना ७ जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता घडली. मक्याच्या पिकात लपलेल्या ५ ते ६ रानडुकरांनी अचानक हल्ला चढवून हमीदखाँ यांना जखमी केले. त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा…

Read More

बिबट्याने बनवले 10 बकऱ्यांना शिकार.. शेतकऱ्याचे दीड लाखाचे नुकसान, मोताळा तालुक्यातील घटना!

  मोताळा:- मोताळा परिक्षेत्रात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. ५ जानेवारी रोजी किन्होळा शिवारात बिबट्याने भास्कर पंढरी गवई यांच्या वाड्यातील १० बकऱ्या फस्त केल्या. या हल्ल्यामुळे सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाने पंचनामा केला असून नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे. या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंस्त्र…

Read More

विहिरीत पडल्याने १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मोताळा तालुक्यातील घटना!

मोताळा :- तालुक्यातील ब्राम्हंदा गावात १९ वर्षीय तरुण सौरभ उर्फ वैभव ईश्वर शिंदे याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शेतात काम करत असताना पाय घसरून विहिरीत पडल्यामुळे ही घटना घडली असावी असा अंदाज लावला जात आहे. सौरभ ४ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास शेतात काम करताना दिसला होता. मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही….

Read More

मोताळा तालुक्यातील पोखरी येथे किरकोळ वादातून मारहाण; एक जखमी, पोस्टेत गुन्हा दाखल

मोताळा :- तालुक्यातील पोखरी येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीला मारहाण झाल्याची घटना घडली असून, संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोखरी येथील रहिवासी उल्हास एकनाथ घाटे यांनी धामणगाव बढे पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गावातील अविनाश कैलास हिवाळे हे त्यांच्या घराशेजारी राहतात. घटनेच्या दिवशी घाटे शेतातून परत आल्यावर जेवण करत असताना…

Read More

दुचाकीने जात असताना नायलॉन मांजाने गळा चिरला, माजी सरपंच गंभीर जखमी; मोताळा – मलकापूर रस्त्यावरील घटना!

मोताळा – मकरसंक्रांतीच्या तोंडावर नायलॉन मांजाचा वापर थांबवण्यात प्रशासनाचे अपयश दिसून आले आहे. मोताळा शहरातील ६२ वर्षीय माजी सरपंच अशोक नंदलाल झंवर यांना नायलॉन मांजामुळे गळ्याला गंभीर दुखापत होऊन रुग्णालयात दाखल करावे लागले.घटना मोताळा-मलकापूर रस्त्यावर घडली. झंवर हे दुचाकीवरून प्रवास करत असताना उडणाऱ्या नायलॉन मांजाने त्यांच्या गळ्याला लचके तोडले, ज्यामुळे त्यांना तातडीने वैद्यकीय मदतीसाठी हलवावे…

Read More

भरधाव कारची स्कूलबसला जोरदार धडक; युवक ठार, प्रवासी बचावले, मोताळा नांदुरा रोडवरील घटना!

मोताळा :- मोताळा येथे २३ डिसेंबरच्या मध्यरात्री घडलेल्या भीषण अपघातात एका ३२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. मोहंमद मुसब अब्दुल जाबीर असे मृत व्यक्तीचे नाव आहे. जळगाव जामोद येथील राणीपार्कमधील रहिवासी असलेले जाबीर हे स्कूलबस सहलीवरून परतत असताना गाडी गरम झाल्याने पाणी भरण्यासाठी थांबले होते. महावितरणच्या १३२ केव्ही उपकेंद्राजवळ थांबलेल्या बसला नांदुऱ्याकडून भरधाव येणाऱ्या होंडा कारने…

Read More

गळफास घेऊन 23 वर्षीय तरुणाची आत्महत्या! मोताळा तालुक्यातील घटना

  मोताळाः तालुक्यातील कुऱ्हा गावात २३ वर्षीय तरुणाने निंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी, २१ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मृतकाचे नाव गजानन पांडूरंग तायडे असे आहे.गजाननचे चुलतभाऊ शिवाजी ओंकार तायडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गजानन तायडे हे २१ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता शेतात…

Read More
error: Content is protected !!