ट्रकची दुचाकीला धडक, एक ठार, एक जखमी; मलकापूर शहरातील घटना!
मलकापूर :- आज, दि.10 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास मलकापूर शहरातील मुंधळा पेट्रोल पंपाजवळ रस्त्याच्या वळणावर ट्रकने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील अजय रत्नाकांत पाटील (वय 37, रा. पारोळा, जिल्हा जळगाव) यांचा मृत्यू झाला, तर प्रसाद भटू (वय 46, रा. पारोळा, जिल्हा जळगाव) हे जखमी झाले.दोघेही मलकापूर येथे धान्य खरेदी…
