नूतन विद्यालयाच्या सोनल खर्चेची राष्ट्रीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत चमकदार कामगिरी

मलकापूर: नूतन विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाच्या १७ वर्षाखालील विद्यार्थीनी कुमारी सोनल गणेश खर्चे हिने राष्ट्रीय सॉफ्ट टेनिस बॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत सुवर्णपदक मिळवून शाळेचे व संपूर्ण शहराचे नाव उज्ज्वल केले आहे.ही स्पर्धा मध्य प्रदेशातील देवास येथे २० डिसेंबर ते २५ डिसेंबर दरम्यान पार पडली. अंतिम सामन्यात महाराष्ट्र संघाने छत्तीसगड संघावर मात करत…

Read More

भरधाव दुचाकीची ऑटोला धडक, ऑटो उलटून चालकासह पाच जखमी, मलकापूर शहरातील घटना!

मलकापूर : भरधाव पल्सर मोटरसायकलने ऑटोरिक्षाला धडक दिल्याने रिक्षा पलटी होऊन पाच जण जखमी झाले. हा अपघात २३ डिसेंबर रोजी संध्याकाळी बोदवड रोडवरील टॉवरजवळ घडला.पल्सर चालक सोपान कांडेलकर यांच्या निष्काळजीपणामुळे रिक्षातील प्रवासी अलका निकम, कैलास निकम, सुरेश अढाव, शोभा भगत, अनिता वराडे आणि रिक्षाचालक अशोक वराडे जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर…

Read More

वादळी वाऱ्यामुळे झाड पडून घर जमीन दोस्त झाले, आई – वडील गंभीर जखमी झाले, तीन गुरे दगावली, सहा महिने उलटूनही वाघमारे कुटुंबाला शासकीय मदतीची प्रतिक्षा

मलकापूर,( उमेश ईटणारे ) दि. 23 डिसेंबर 2024: मलकापूर तालुक्यात 26 मे 2024 रोजी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे घिर्णी भाग 1 येथील मनोहर शंकर वाघमारे यांचे कुटुंब मोठ्या आर्थिक आणि मानसिक संकटात सापडले आहे. वडाचे मोठे झाड त्यांच्या घरावर कोसळून संपूर्ण घर जमीनदोस्त झाले. या दुर्घटनेत तीन गुरांचा मृत्यू झाला, तर मनोहर वाघमारे व त्यांच्या पत्नी…

Read More

घुसर फाट्याजवळ भीषण अपघात: काळी पिवळी व स्विफ्ट गाडीचा समोरासमोर धडक; तिघे जखमी

मलकापूर: आज (24 डिसेंबर) सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घुसर फाट्याजवळ भीषण अपघात झाला. काळी पिवळी प्रवासी वाहन (एम एच 28 एच 1077) व स्विफ्ट चारचाकी वाहन यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात काळी पिवळी वाहनातील दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले असून स्विफ्ट वाहनाचा चालक गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने बुलढाणा येथे उपचारासाठी हलवण्यात आले…

Read More

शेतकऱ्यांच्या तुरीच्या पिकाला अज्ञात व्यक्तीने लावली आग, एक एकर पिक जळून खाक, हजारोंचे नुकसान! मलकापूर शहरातील घटना

  मलकापूर, १९ डिसेंबर: दळाचा मारोती शिवारात शेतातील उभ्या तुरीच्या पिकाला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याने मोठे नुकसान झाले आहे. या आगीत सुमारे एक एकर तुरीचे पीक पूर्णतः जळून खाक झाले असून, शेतकऱ्यांना २५ ते ३० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे.प्राप्त माहितीनुसार, शेतकरी अशोक सूर्यवंशी (पाटील) आणि प्रकाश सूर्यवंशी (पाटील) यांच्या शेतातील उभ्या…

Read More

आंतरराष्ट्रीय पातळीवर कोलते महाविद्यालय इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स मार्फत ‘इंजिनिअरिंग एक्सलन्स अवॉर्ड’ नी पुरस्कारीत

  मलकापूर: इंस्टीट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) आयईआय ही भारतातील एक प्रतिष्ठित आणि ऐतिहासिक बहुविषयक व्यावसायिक अभियांत्रिकी संस्था आहे. ही संस्था 1920 साली स्थापन झाली असून तिचे मुख्यालय कोलकाता येथे आहे. गेल्या शतकामध्ये, आयईआय ने अभियांत्रिकी क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. भारतभर 124 केंद्रे, 6 परदेशी अध्याय, 7 विशेष मंचे, आणि 15 अभियांत्रिकी शाखांचा समावेश असलेल्या…

Read More

पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय मलकापूर येथे संत गाडगेबाबा पुण्यतिथी उत्साहात साजरी

  मलकापूर : दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथे वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी अत्यंत श्रद्धा आणि उत्साहाने साजरी करण्यात आली. संत गाडगेबाबा यांनी समाजसेवेचा आदर्श घालून दिला असून त्यांच्या स्वच्छता अभियान, शिक्षणासाठी घेतलेले योगदान आणि समाज सुधारण्यासाठी केलेल्या कार्यामुळे ते कायमच प्रेरणादायी ठरले आहेत. कार्यक्रमाची सुरुवात…

Read More

संत गाडगेबाबांचा खरा इतिहास समाजासमोर आणणे गरजेचे- डॉ.बालाजी जाधव

  मलकापूर :- आपण जुन्या रूढी व परंपरांना फाटा देत विज्ञाननिष्ठ बाबींना अंगीकारून शिक्षणाला महत्व द्यावे, आजच्या या धकाधकीच्या जिवनात शिक्षणच तुम्हाला तारणार आहे. या सोबतच गाडगेबाबांचा खरा इतिहास हा नवीन पिढीसमोर येणे गरजेचे असल्याचे मत गाथा चिंतन ट्रस्ट संभाजी नगरचे अध्यक्ष डॉ.बालाजी जाधव यांनी राष्ट्रसंत गाडगे महाराज पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त व्यक्त केले. सर्वभाषिक परिट (धोबी)…

Read More

“व्यसनमुक्त जीवनाचा संदेश देणारी पोस्टर व स्लोगन स्पर्धा चांडक विद्यालयात संपन्न”

  मलकापूर: नगर सेवा समिती मलकापूर संचलित लिलाधर भोजराज चांडक विद्यालयात संत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त दि. 20 डिसेंबर 2024 रोजी पोस्टर मेकिंग व स्लोगन स्पर्धा आयोजित करण्यात आली. विज्ञान शिक्षिका सौ. राजश्री कुसुबे यांच्या मार्गदर्शनाखाली सातवी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य डॉ. जयंत राजूरकर यांच्या हस्ते संत गाडगे बाबांच्या…

Read More

दोन ट्रकांची समोरासमोर धडक; दोघे जखमी, मलकापूर शहरातील घटना!

मलकापूर : मलकापूर शहराजवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर हॉटेल सूर्या नजीक दोन ट्रकांची समोरासमोर धडक झाल्याने मोठा अपघात घडला. ही घटना 19 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता घडली. या अपघातात दोघेजण जखमी झाले असून वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका मालवाहतूक ट्रक आणि भारत पेट्रोलियम कंपनीच्या ट्रकाची समोरासमोर जोरदार टक्कर झाली. धडक…

Read More
error: Content is protected !!