Headlines

वीज तारा चोरीचा प्रकार; ४८ हजारांचा मुद्देमाल लंपास! नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजीची घटना

नांदुरा :- तालुक्यातील वडनेर भोलजी शिवारात वीज तारा चोरीचा प्रकार उघडकीस आला असून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ही घटना ७ ते ८ एप्रिलदरम्यान घडल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भोजने रोहित्र परिसरातील सहा गाळ्यांमधून तीन फेज, चार वायर प्रणालीतील सुमारे १२०० मीटर लांबीची वीज तार चोरीला गेली आहे. या…

Read More

ढाब्यावर ट्रकचालकावर हल्ला; साखळी व रोख रक्कम लंपास! मलकापूरातील तिघांवर नांदुरा पोलिसांत गुन्हा दाखल

नांदुरा :- तालुक्यातील वडनेर भोलजी येथे एका ढाब्यावर जेवण करत असलेल्या ट्रकचालकावर तिघांनी हल्ला करून त्याच्याकडील सोन्याची साखळी व रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी नांदुरा पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खान फिरोज खान (वय ३४, रा. सुरत, गुजरात) हे ट्रकचालक ६ एप्रिल रोजी रात्री उशिरा आपल्या मित्रासह ढाब्यावर…

Read More

शेतशिवारात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री सहा शेतकऱ्यांच्या पाणबुडी मोटारी चोरी! नांदुरा तालुक्यातील घटना

  नांदुरा :- तालुक्यातील पिंप्री कोळी शेतशिवारात अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री धाडसी चोरी करत सहा शेतकऱ्यांच्या पाणबुडी मोटारी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सावरगाव नेहू येथील शेतकरी सुपडा बोरसे (वय ५५) हे शेतात पाणी देण्यासाठी गेले असता मोटार सुरू होत नसल्याचे त्यांच्या लक्षात…

Read More

एअरबॅगमुळे मोठा अनर्थ टळला; नांदुरा रोडवर कार आणि मालवाहू वाहनाची समोरासमोर धडक!

  खामगाव :- शहरातील नांदुरा रोडवरील जिल्हा परिषद हायस्कूलसमोर गुरुवारी दुपारी कार आणि मालवाहू वाहनाची समोरासमोर धडक होऊन अपघात घडला. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी टळली असून मालवाहू चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टॉवर चौकाकडून जलंब नाका दिशेने जाणारे मालवाहू वाहन (क्र. एमएच-२८-बीए-००८८) आणि केला नगर परिसरातून वन विभाग कार्यालयाजवळ रस्ता ओलांडत असलेली कार…

Read More

चहा पित असताना टेबलवरून बॅग लंपास; ग्राहकाचे १.०५ लाख रुपये चोरीला; नांदुऱ्याची घटना!

  नांदुरा : शहरातील जुन्या बसस्टॉप परिसरातील एका रेस्टॉरंटमध्ये चहा पिण्यासाठी आलेल्या ग्राहकाची पैशांनी भरलेली लेदर बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. या घटनेत १ लाख ५ हजार रुपये रोख रक्कम, चेकबुक व पासबुक असा मुद्देमाल चोरीला गेला असून परिसरात खळबळ उडाली आहे. तालुक्यातील पलसोडा येथील दिनेशसिंह हिंमतसिंह राजपूत (वय ६३) हे…

Read More

गांधी चौकात गाडी पार्किंगवरून वाद; कापड व्यापाऱ्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल!

नांदुरा : शहरातील गांधी चौक परिसरात वाहन उभे करण्याच्या कारणावरून दोन व्यावसायिकांमध्ये वाद होऊन मारहाणीची घटना घडली. या प्रकरणी नांदुरा पोलिसांनी कापड व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. माहितीनुसार, सराफा व्यवसाय करणारे प्रवीण सुरेश उज्जैनकर (वय ५०) हे २२ फेब्रुवारी रोजी दुपारी बाहेरगावाहून परतल्यानंतर आपल्या घरासमोर कार उभी करून घरात गेले होते. त्यावेळी शेजारील कापड दुकानाचे मालक…

Read More

शेजारील वाद उफाळला; महिलेला मारहाण, जलंब पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा!

  नांदुरा :- तालुक्यातील आंबोडा बरड येथे शेजाऱ्यांमधील जुना वाद उफाळून आल्याने एका महिलेला मारहाण झाल्याची घटना १४ फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी जलंब पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मंगला अनिल इंगळे (वय ३४, रा. आंबोडा फाटा, बरड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, काही दिवसांपूर्वी लहान मुलांच्या किरकोळ कारणावरून शेजाऱ्यांमध्ये वाद…

Read More

हुंडा व विवाहबाह्य संबंधांच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा

नांदुरा : सासरकडून होणारा मानसिक व शारीरिक छळ, पतीचे कथित विवाहबाह्य संबंध आणि पाच लाखांच्या हुंड्याची मागणी या त्रासाला कंटाळून २९ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील निमगाव येथे १४ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी पतीसह सासू, सासरे आणि दिर यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून चौघांना पोलिसांनी…

Read More

60 वर्षीय नराधामांचा 16 वर्षीय तरुणांसोबत गैरवर्तन; वडणेर भोलजी येथील घटना; पोक्सो अंतर्गत गुन्हा

नांदुरा:- वडनेर भोलजी येथे १६ वर्षीय अल्पवयीन मुलासोबत गैरवर्तन केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी ६० वर्षीय व्यक्तीविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगपूर (ता. नांदुरा) येथील १६ वर्षीय मुलगा दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ९.१५ वाजता वडनेर भोलजी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ लगत असलेल्या पंचमुखी हनुमान मंदिराजवळ…

Read More

खुमगाव रेल्वे स्थानकाजवळ अनोळखी व्यक्तीची रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या; नांदुरा पोलिसांकडून ओळख पटवण्याचे आवाहन

  नांदुरा : – खुमगाव रेल्वे स्थानकाजवळ २ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे चारच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मृताचे वय अंदाजे ५० वर्षे असून अंगात पांढरा शर्ट व काळी पॅन्ट होती. घटनेची माहिती मिळताच नांदुरा पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिस कर्मचारी दीपक सोळंके यांच्यासह ओमसाई फाउंडेशनचे अध्यक्ष विलास निंबोळकर, राहुल निमकर्डे,…

Read More
error: Content is protected !!