लोहगाव येथून वॉचमन बेपत्ता; पत्नीची पोलिसांत तक्रार
पुणे : ‘गावी जाऊन परत येतो’ असे सांगून घरातून निघालेला ३० वर्षीय वॉचमन अद्याप घरी परतला नसल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. आकाश सुरेश धुरंदर असे बेपत्ता व्यक्तीचे नाव असून, त्यांच्या पत्नीने लोहगाव पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल केली आहे. आकाश धुरंदर हे १० सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास गावी जात असल्याचे सांगून घरातून निघून…
