अंघोळीचे अश्लील फोटो काढले; “माझ्याशी शारीरिक संबंध ठेव, अन्यथा फोटो व्हायरल करीन; अतिथी रेस्टॉरंट चालकाविरुद्ध अॅट्रॉसिटीसह गुन्हा
शेगाव : शहरातील खामगाव रोडवरील अतिथी रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या एका महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेचे अंघोळ करतानाचे अश्लील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने शारीरिक संबंधांसाठी दबाव टाकल्याचा आरोप असून, विरोध केल्यानंतर मारहाण व जातीवाचक शिवीगाळ करण्यात आल्याची तक्रार पीडित महिलेने शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी…
