जुन्या वादातून अल्पवयीन युवकाला बेदम मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, मलकापूर शहरातील घटना!
मलकापूर :- शहरातील नवीन ईदगाह गणवाडी रोड परिसरातील गुलशन प्लॉट भागात जुन्या वादाच्या कारणावरून १७ वर्षीय युवकाला लोखंडी पाइप, बेल्ट तसेच चापटा-बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मलकापूर शहर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख मुसद्दीक अकल शेख राईस बागवान (वय १७, रा. ताजनगर, पारपेठ,…
