मलकापुरात चोरीचे सत्र सुरूच, बन्सीलाल नगर मधील एकाच दिवशी तीन घरे फोडली, दाग दागिने, टीव्ही, रोख रक्कम लंपास
मलकापूर : येथील बन्सीलाल नगर परिसरात एकाच रात्री तीन घरफोड्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील बन्सीलाल नगर, संत एकनाथ मार्ग परिसरात रात्री २ वाजताच्या सुमारास वेगवेगळ्या ठिकाणी तीन घरफोड्या झाल्याची घटना सोमवार, ८ जुलै रोजी घडल्या. यामुळे परीसरातील नागरिकांमध्ये भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रीकृष्ण त्रंबक पारसकर यांच्या घरी कोणी नसल्याची संधी…
