नांदुरा : शेतात जात असलेल्या ३३ वर्षीय विवाहिते सोबत तिघांनी कारमधून येऊन रस्त्यामध्ये अश्लील चाळे करून विनयभंग करुन लैंगिक अत्याचार करीत खून करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना २८ जुलै रोजी सकाळी ९.४५ वाजे दरम्यान तालुक्यातील कोकलवाडी-वरखेड शिवारात घडली.या प्रकरणी तीन जणांविरुद्ध नांदुरा पोस्टेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने नांदुरा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की ती तिचे चुलत सासरे यांच्यासोबत शेतात जात असताना रस्त्यावरून माझ्या जवळून एक पांढऱ्या रंगाची कार जोरात गेली व पावसाळ्याचे दिवस असल्याने डबक्यातील पाणी माझ्या अंगावर उडाल्याने मी कार चालकाला जोरात आवाज देऊन तुला एवढी मोठी बाई दिसत नाही का? असे म्हटल्याने कारचालक आरोपी रामेश्वर दादाराव भगत याने गाडी थांबून खाली उतरला व मला शिवीगाळ करीत माझ्या कानाखाली जोरात चापट मारल्याने मी खाली बसले असता त्याने मला मागून उचलून पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मी आरडा-ओरड केली असता गाडीत बसलेले आरोपी योगेश दादाराव भगत व मोहन शंकर भगत हे दोघेही गाडीतून उतरून आले व तिघांनी माझ्याशी अश्लील चाळे करून हिच्यावर लैंगिक अत्याचार करुन व हीचा मर्डर करून टाकू अशी धमकी दिली. या प्रकरणी नांदुरा पोलिसांनी वरील तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ११५(२), ३(५), ३५१ (२) (३) अन्वये गुन्हे नोंद करण्यात आले असून पुढील तपास नांदुरा पोलीस करीत आहे.