नांदुरा : तालुक्यातील भोईशिंगा आणि अंबोडा शिवारातील शेतांमध्ये कृषीपंपांना वीजपुरवठा करणाऱ्या लघुदाब वीजवाहिनीवरील अॅल्युमिनियम तार चोरीला गेल्याची घटना २१ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. अज्ञात चोरट्यांनी वीजवाहिनीच्या सात गाळ्यांमधील तार चोरून नेल्याने सुमारे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
या घटनेप्रकरणी नांदुरा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.