Headlines

घरासमोर उभी दुचाकी रात्रीतून गायब; पिंप्राळ्यात २५ हजारांची चोरी

खामगाव : घरासमोर सुरक्षित असल्याच्या विश्वासाने उभी केलेली दुचाकी रात्रीच्या अंधारात चोरट्याने लंपास केल्याची घटना तालुक्यातील पिंप्राळा येथे उघडकीस आली. सकाळी मोटारसायकल जागेवर नसल्याचे दिसताच मालकाने परिसरात शोधाशोध केली; मात्र दुचाकीचा कुठेही थांगपत्ता लागला नाही.
पिंप्राळा येथील नारायण माणिकराव पेसोडे (वय ३०, व्यवसाय शेती) यांनी १९ नोव्हेंबर रोजी रात्री जेवणानंतर आपली मोटारसायकल घरासमोर उभी केली होती. त्यानंतर ते झोपण्यासाठी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पाहिले असता मोटारसायकल जागेवर दिसली नाही. परिसरासह इतर ठिकाणी शोध घेतला, मात्र दुचाकी मिळून आली नाही. एमएच २८ बीजी ०५७१ क्रमांकाची, अंदाजे २५ हजार रुपये किमतीची मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी नारायण पेसोडे यांच्या तक्रारीवरून २२ नोव्हेंबर रोजी खामगाव ग्रामीण पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *