Headlines

रिपोर्ट देण्यावरून वाद; तरुणाला काठी-रॉडने मारहाण; घरच्यांनी पोलिसांत तक्रार का केली, यावरून चौघांचा संताप; अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी; मलकापूर तालुक्यातील घटना

मलकापूर : घरच्यांनी पोलिसांविरुद्ध तक्रार का केली, असा जाब विचारत एका तरुणाला रस्त्यात अडवून चौघांनी काठी व लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना हिंगणा काझी येथे घडली. या मारहाणीत अश्लील शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकीही देण्यात आल्याचा आरोप असून, या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मुदब्बिर खाजा मोइनोयीन (रा. हिंगणा काझी, ता. मलकापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास ते जनावरांना पाणी पाजण्यासाठी जात होते. त्याचवेळी गावातील चार जणांनी त्यांना रस्त्यात अडवून, तुमच्या घरातील लोक आमच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार देण्यासाठी का गेले, असा सवाल करीत वाद घातला. वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. चौघांनी लाकडी काठी आणि लोखंडी रॉडने मारहाण करीत अश्लील शिवीगाळ केली. याशिवाय जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी खाजा वहाबउद्दीन खाजा अलीमउद्दीन, खाजा शहजादउद्दीन, खाजा शोयेबउद्दीन आणि खाजा शहबाजउद्दीन (सर्व रा. हिंगणा काझी) यांच्याविरुद्ध ग्रामीण पोलिसांनी अप.क्र. २४३/२०२६ अन्वये कलम ११८(१), २९६, ११५(२), ३५२, ३५१(२)(३) व ३(५) BNS अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *