मलकापूर : दाताळा येथील १९ वर्षीय तरुणी अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नातेवाइकांनी परिसरासह संभाव्य ठिकाणी शोध घेऊनही तिचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर याप्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाताळा येथील प्रल्हाद कुळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची भाची (वय १९, रा. दाताळा) ही ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास अचानक बेपत्ता झाली. ती घरी परत न आल्याने नातेवाइकांनी परिसरात तसेच नातेवाइकांकडे तिचा शोध घेतला. मात्र, सर्वत्र शोध घेऊनही ती मिळून आली नाही. त्यामुळे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तिचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक २२८/२०२६, कलम १४०(३) भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.