मूर्तिजापूर : स्थानिक एका ३५ वर्षीय महिलेचा विनयभंग करून तिच्यावर अतिप्रसंग करण्याची घटना ११ मे रोजी घडल्याची फिर्याद आज दिल्यावरून पाच जणांविरुद्ध सिटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्राप्त माहितीनुसार पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, ती घरात सामान लावत असताना रविदास नगरात राहत असलेले आरोपी यांनी बेकायदेशीरपणे घरात घुसून तिचा बुरखा फाडत विनयभंग केला. तसेच अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करीत अश्लील शिवीगाळ करीत आमच्या वेटाळातील घर खाली कर नाहीतर तुला तुझ्या मुलाबाळांसह जीव मारून टाकण्याची धमकी दिल्याचे फिर्यादमध्ये नमूद केले. या फिर्यादीवरून आरोपी सुरेश दुर्गा अंभोरे, किरण दुर्गा अंभोरे, महेश सुरेश अंभोरे, सुजल किरण अंभोरे व राणी किरण अंभोरे सर्व रा. संत रविदास नगर मूर्तिजापूर यांच्यविरुद्ध सिटी पोलिस ठाण्यात कलम ४५२, ३५४, २९४, ५०६, १४३,१४७ भादंवि नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी करीत आहेत.