मोताळाः लहान मुलाच्या पाळण्याच्या दोरीला गळफास; ३५ वर्षीय विवाहितेची आत्महत्या

मोताळा : शहरातील ख्वाजा गरीब नवाज नगर परिसरात एका ३५ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात लहान मुलाच्या पाळण्याच्या दोरीला रुमालाच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी, २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली. फरजाना बी सलीम शाह असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत सलमान शाह इब्राहिम शाह (रा. वृंदावन नगर, मोताळा) यांनी बोराखेडी पोलिसांत फिर्याद दिली. त्यांचा मोठा भाऊ सलीम शाह हे पत्नी फरजाना बी, दोन मुली व एका मुलासह ख्वाजा गरीब नवाज नगर परिसरात वास्तव्यास आहेत. शनिवारी सायंकाळी सुमारे ५ वाजताच्या सुमारास फरजाना बी यांनी राहत्या घरी लहान मुलाच्या पाळण्याच्या दोरीला रुमाल बांधून गळफास घेतल्याचे उघडकीस आले. घटनेच्या वेळी फिर्यादी सलमान शाह हे बोदवड येथे गेले होते. दरम्यान, अकरम शाह यांनी फोनवरून या दुर्दैवी घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच सलमान शाह यांनी तातडीने मोताळा गाठले. घरी पोहोचल्यानंतर त्यांना वहिनी फरजाना बी या पाळण्याच्या दोरीला रुमालाच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या. घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. सलमान शाह यांच्या फिर्यादीवरून बोराखेडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पुढील तपास बोराखेडी पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!