मलकापूर : धर्मवीर यूथ फाऊंडेशनच्या मलकापूर शहर उपप्रमुखपदी विजय तांबे यांची निवड करण्यात आली आहे. संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा प्रमुख ओम टप व शहर प्रमुख विशाल वानखेडे यांच्या नेतृत्वात ही नियुक्ती करण्यात आली. धर्म, राष्ट्र आणि हिंदू संस्कृतीच्या रक्षणासाठी कार्यरत असलेल्या धर्मवीर यूथ फाऊंडेशनच्या माध्यमातून विजय तांबे यांनी आतापर्यंत केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांची एका वर्षाच्या कालावधीसाठी तालुका उपप्रमुखपदी निवड करण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे. तरुणांमध्ये राष्ट्रभक्ती, धर्मनिष्ठा आणि स्वाभिमान जागृत करण्यासोबतच सामाजिक एकजूट मजबूत करण्यासाठी कार्य करण्याची जबाबदारी तांबे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तसेच अन्याय व अत्याचाराविरोधात ठामपणे उभे राहून फाऊंडेशनचे कार्य अधिक व्यापक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विजय तांबे यांच्या निवडीबद्दल मलकापूर तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, आगामी काळात संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे वाढविण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.