Headlines

११ वर्षीय विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू, जळगांव जामोद तालुक्यातील घटना!

जळगाव जामोद : तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील भटक्या-विमुक्त जाती-जमातींसाठीच्या सरस्वती निवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या ११ वर्षीय विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे आश्रमशाळा परिसरात शोककळा पसरली आहे.
मोहित अनिल वाकुडकर (वय ११, रा. धानोरा महासिद्ध) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो इयत्ता पाचवीचा विद्यार्थी होता. काही दिवसांपूर्वीच त्याने आश्रमशाळेत प्रवेश घेतला होता.
प्राथमिक माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी शौचालयासाठी बाहेर गेलेल्या मोहितचा पाय घसरल्याने तो पाण्यात पडून बुडाला. ही बाब लक्षात येताच परिसरातील युवकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत त्याला पाण्याबाहेर काढले. त्यानंतर उपचारासाठी नांदुरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
घटनेनंतर आश्रमशाळा परिसरात हळहळ व्यक्त होत असून या प्रकरणी उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नव्हता. तसेच, शाळा प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!