समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; डॉक्टर दाम्पत्य ठार, तिघे गंभीर

सिंदखेडराजा : समृद्धी महामार्गावरील आणखी एका भीषण अपघातात छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची दोन मुले व चालक गंभीर जखमी झाले. मंगळवारी सकाळी किनगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत फॉर्च्यूनर कारने चालत्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने हा हृदयद्रावक अपघात घडला.
या अपघातात डॉ. सय्यद असिफ सय्यद उमर (५२) व त्यांच्या पत्नी गुलसितान बी सय्यद असिफ (४५) यांचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगी नबा सय्यद असिफ (१८), मुलगा सय्यद अजबमाझ सय्यद असिफ (२५) आणि चालक शेख साजिद शेख फरीद (३६) हे गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस व क्यूआरव्ही पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास किनगाव राजा पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!