Headlines

जुन्या वादातून अल्पवयीन युवकाला बेदम मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, मलकापूर शहरातील घटना!

मलकापूर :- शहरातील नवीन ईदगाह गणवाडी रोड परिसरातील गुलशन प्लॉट भागात जुन्या वादाच्या कारणावरून १७ वर्षीय युवकाला लोखंडी पाइप, बेल्ट तसेच चापटा-बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मलकापूर शहर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख मुसद्दीक अकल शेख राईस बागवान (वय १७, रा. ताजनगर, पारपेठ, मलकापूर) याला आरोपींनी “तुझ्याशी बोलायचे आहे” असे सांगून सोबत नेले. त्यानंतर जुन्या मोटारसायकल धक्क्याच्या वादातून आरोपींनी त्याच्यावर हल्ला केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
आरोपी शेख अकील शेख कलीम पटेल याने लोखंडी पाइपने मारहाण केली, तर शेख शकील शेख कलीम याने कमरेच्या बेल्टने मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच सरफराज उर्फ जोकर शेख आरीफ याने चापटा व बुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले. मारहाणीनंतर “पुन्हा आमच्या नादी लागलास तर जिवे मारून टाकू,” अशी धमकीही आरोपींनी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी मलकापूर शहर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक सुरेश रोकडे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!