शेतकऱ्यांना शेती मशागतीसाठी पेट्रोल,डिझेल कॅन मध्ये देण्याची शिवसेना (उबाठा)ची उपविभागीय अधिकारी मार्फत पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचेकडे मागणी उपाययोजना न केल्यास शेतकऱ्यांसह बैलगाडी मोर्चा काढण्याचा इशारा
शेतकऱ्यांना शेती मशागतीसाठी पेट्रोल,डिझेल कॅन मध्ये देण्याची शिवसेना (उबाठा)ची उपविभागीय अधिकारी मार्फत पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचेकडे मागणी उपाययोजना न केल्यास शेतकऱ्यांसह बैलगाडी मोर्चा काढण्याचा इशारा
मलकापुर :- शेतकऱ्यांना शेती मशागतीसाठी ट्रॅक्टर व पंपाद्वारे शेती तयार करण्याकरीता पेट्रोल पंपावरून कॅन मध्ये पेट्रोल, डिझेल देण्याची मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांच्या नेतृत्वात उपविभागीय (महसूल) अधिकारी संतोष शिंदे यांच्या मार्फत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद केले आहे की येणाऱ्या जून महिन्यात शेतकऱ्यांना पेरणी करावे लागते. आजच्या स्थितीत शेतीचे मशागत व तयार करणे गरजेचे असल्याने ट्रॅक्टर, डिझेल यंत्राशिवाय शेती तयार करता येत नाही व ग्रामीण भागातून विविध पेट्रोल पंपावर डिझेल यंत्र नेणे अवघड असते व ट्रॅक्टर नेल्यास ट्रॅक्टर मधील डिझेल अनावश्यक खर्च होते म्हणून पेट्रोल पंप धारकांनी शेतकऱ्यांना कॅन मध्ये पेट्रोल डिझेल देण्याबाबत सूचना व आदेश करण्यात यावे अन्यथा शिवसेनेच्या शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा काढण्याचा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांनी उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांना दिला आहे. निवेदनावर शिवसेना शहर प्रमुख हरीदास गणबास, विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत,शिवसेना उपशहर प्रमुख बाळू पोलाखरे, वाहतूक सेना शहर प्रमुख इम्रान लकी, विभागप्रमुख सत्तार शाह, शाखाप्रमुख हसन गौरी, दामोदर मनोहर नाव्हकर ,संतोष चव्हाण,वासुदेव भोगे सह शिवसेना पदाधिकारी व शेतकऱ्यांची उपस्थिती होती.