दुचाकीच्या धडकेत मॉर्निंग वॉक करणारा १ ठार; १ जखमी

जलंब : जलंब-माटरगाव मार्गावर सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोन इसमांना भरधाव दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दुसरा जण गंभीर जखमी झाला. ही दुर्दैवी घटना १० एप्रिल रोजी सकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास निंबी गावाजवळ घडली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माटरगाव (ता. शेगाव) येथील रहिवासी शालिग्राम लाड आणि जानू भुतडा हे दोघेही सकाळी नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. ते जलंब-माटरगाव मार्गावरून चालत असताना खामगावकडून येणाऱ्या एका भरधाव वेगातील दुचाकीस्वाराने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोघेही रस्त्यावर फेकले गेले व गंभीर जखमी झाले. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ दोघांनाही उपचारासाठी जवळच्या दवाखान्यात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना शालिग्राम लाड यांचा मृत्यू झाला. तर जानू भुतडा हे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे समजते.
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!