Headlines

नॅशनल हायस्कूलसमोर चाकू दाखवत दहशत; दोघांविरुद्ध गुन्हा!

खामगाव : – शहरातील नॅशनल हायस्कूलसमोर चाकू दाखवत दहशत निर्माण केल्याप्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ६ मार्च रोजी सकाळच्या सुमारास घडली.

याप्रकरणी गौतम मोहन इंगळे (रा. वरखेड खुर्द, ता. शेगाव) यांनी खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, नॅशनल हायस्कूलसमोरील रस्त्यावर काही तरुण संशयास्पद हालचाली करत असल्याचे इंगळे यांच्या लक्षात आले. त्यांनी त्यांना याबाबत विचारणा केली असता संकेत नंदू कदम (रा. चांदमारी, खामगाव) व दुर्गेश संतोष सोनुने (रा. बाळापूर फैल, खामगाव) यांनी वाद घालत शिवीगाळ केली.
यावेळी आरोपींपैकी एकाने चाकू काढून परिसरात दहशत निर्माण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या घटनेनंतर इंगळे यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. तक्रारीच्या आधारे खामगाव शहर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!