गस्तीवर असलेल्या पोलिसाशी गैरवर्तन; तिघांवर गुन्हा दाखल

 

मेहकर :- शहरातील वाटिका चौक परिसरात गस्तीदरम्यान पोलिस कर्मचाऱ्याशी धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना बुधवारी (दि. ११) रात्री घडली. या प्रकरणी मेहकर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिस कॉन्स्टेबल शिवाजी श्रीराम चिमण (वय ३०) हे नियमित गस्त घालत असताना एमएच-२८-बीएच-६६६८ क्रमांकाच्या दुचाकीवर तिघेजण ट्रिपल सीट आरडाओरड करत जात असल्याचे आढळले. वाहन थांबवून चौकशी करत असताना मुजाहीद मुकद्दर कुरेश (१८, रा. इमामवाडा) याने पोलिसांच्या गणवेशाची कॉलर पकडून धक्काबुक्की केल्याचा आरोप तक्रारीत नमूद आहे. दरम्यान, शेख बिलाल शेख अयाज (१८, रा. इमामवाडा) व रेहान वाजिद कुरेशी (१८, रा. माळीपेठ) यांनी शिवीगाळ करत गोंधळ घातल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. उपस्थित नागरिकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला; मात्र आरोपींनी शासकीय कर्तव्यात अडथळा आणल्याचे पोलिसांनी सांगितले. फिर्यादीच्या तोंडी अहवाल व वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक कांचन जारवाल करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!