नांदुरा : – खुमगाव रेल्वे स्थानकाजवळ २ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे चारच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मृताचे वय अंदाजे ५० वर्षे असून अंगात पांढरा शर्ट व काळी पॅन्ट होती. घटनेची माहिती मिळताच नांदुरा पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिस कर्मचारी दीपक सोळंके यांच्यासह ओमसाई फाउंडेशनचे अध्यक्ष विलास निंबोळकर, राहुल निमकर्डे, आश्विन फेरण, विष्णू धांडे, कृष्णा वसोकार, नितीन ठाकरे, वैभव राहणे व बाळू राऊत यांनी मदतकार्य केले. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून, कोणाला काही माहिती असल्यास नांदुरा पोलिस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, याच परिसरात रविवारी सकाळीही एका युवकाचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
