मोताळा : तालुक्यातील चिंचपूर फाटा येथे एका ७७ वर्षीय वेडसर महिलेचा मृतदेह १० मे ला आढळला. मृतक महिलेचे नाव केसरबाई सुरडकर असे आहे. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. चिंचपूर येथील निंबाजी सुरडकर यांनी बोराखेडी पोस्टे. ला दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, त्यांची वयोवृध्द आई केसरबाई सुरडकर यांच्या डोक्यात फरक पडला होता. त्या इकडे तिकडे फिरत असायच्या, ६ मे रोजी घरी कोणाला काही न सांगता त्या निघून गेली होती. त्यांचे प्रेत १० मे रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान आढळून आल्याच्या फिर्यादीवरुन बोराखेडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.