Headlines

घरफोडी करून १.८० लाखांचे दागिने लंपास; जळगाव जामोद येथील घटना

जळगाव जामोद: शहरातील कृष्णानगर परिसरात चोरट्यांनी घरफोडी करत तब्बल १ लाख ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना ५ मार्चच्या रात्री घडली असून, याबाबत ६ मार्च रोजी जळगाव जामोद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार मनोज वासुदेव वानखडे (३७, रा. कृष्णानगर, जळगाव जामोद) यांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाट फोडले. यात त्यांच्या पत्नीचे राणीहार (४२ ग्रॅम), नेकलेस (१५ ग्रॅम), छोटी पोत (५ ग्रॅम), अंगठी (५ ग्रॅम) आणि कानातील दागिने (५ ग्रॅम) असा एकूण १.८० लाखांचा ऐवज चोरीला गेला.
या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३५५(अ), ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नारायण सरकटे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!