आसलगाव : – गावातील रमेश शंकर येनकर यांच्या घराला ३ मार्च रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. प्राथमिक अंदाजानुसार, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे समजते. या आगीत घरातील फ्रिज, कुलर, टीव्ही, गृहउपयोगी साहित्य, कपडे, महत्त्वाची कागदपत्रे तसेच रोख रक्कम २५ ते ३० हजार रुपये जळून खाक झाली. एकूण ७० ते ८० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सुदैवाने, घरातील सर्व सदस्य त्या वेळी बाहेर कार्यक्रमाला गेले होते, त्यामुळे जीवितहानी टळली.
घटनेची माहिती मिळताच तलाठी उके आणि ग्रामविकास अधिकारी पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यांनी या नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर केला आहे.