Headlines

उज्जैनहून दर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या कारला भीषण अपघात – एक ठार, तिघे गंभीर जखमी, नांदुरा तालुक्यातील वडनेर येथील घटना!

 

नांदुरा:- तालुक्यातील वडनेर येथे उज्जैनहून दर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या कारला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक युवक जागीच ठार, तर तिघे गंभीर जखमी झाले.
ही घटना (२८ जानेवारी) पहाटे ५ वाजता घडली. खामगाव येथील रोशन अनिल ठाकरे, प्रतीक कैलास अवधूत, अक्षय वसंता कळसकर आणि अमन पुरवार हे स्विफ्ट डिझायर (MH 14 FC 0284) कारने उज्जैनला गेले होते. दर्शन करून परतत असताना वडनेर येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार समोर जात असलेल्या ट्रकला धडकली. अपघातात रोशन अनिल ठाकरे (२२, रुक्मिणी नगर, गोपाळ नगर, खामगाव) याचा जागीच मृत्यू झाला. प्रतीक अवधूत (शेगाव), अक्षय कळसकर (सुटाळा) आणि अमन पुरवार (भाटिया लेआउट, गोपाळ नगर) गंभीर जखमी झाले. अपघातानंतर ओम साई फाउंडेशनच्या पथकासह नांदुरा पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले. पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथे हलवण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!