Headlines

मजुराचा पाण्यात पडून मृत्यू, मोताळा तालुक्यातील पिंपळगाव देवी येथील घटना!

मोताळा :- तालुक्यातील पिंपळगाव देवी येथे एका मजुराचा पाण्यात पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मृत मजुराचे नाव गणपत जगन भोई (वय ४५) असून, तो बऱ्हाणपूर जिल्ह्यातील मांजरोद येथील रहिवासी होता. पिंपळगाव देवी यात्रेत अनिल भोई (रा. बोदवड) यांच्या दुकानात गणपत भोई काम करीत होता. मात्र, दारुचे व्यसन असल्यामुळे तो १४ जानेवारी रोजी दुपारी कोणालाही न सांगता निघून गेला. त्याचा शोध घेतला असता, लोणवाडी रस्त्यावरील पुलाखाली पाण्यात मृतावस्थेत आढळून आला.

या प्रकरणी मोताळा पोलिस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला असून, पुढील तपास ठाणेदार नागेश जायले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेंद्र राणे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!