मोताळा :- शेतात गव्हाला पाणी देत असताना अचानक रानडुकराने हल्ला केल्यामुळे शेतकरी जखमी झाल्याची घटना कोथळी शिवारात घडली. जखमी हमीदखाँ समशेरखॉ (४६) यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटना ७ जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता घडली. मक्याच्या पिकात लपलेल्या ५ ते ६ रानडुकरांनी अचानक हल्ला चढवून हमीदखाँ यांना जखमी केले. त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी धाव घेतली, ज्यामुळे रानडुकरे पळाली. हल्ल्यात हमीदखाँ यांच्या पंजाला आणि डाव्या मांडीवर गंभीर जखमा झाल्या आहेत.