जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील टाकळी गावातील सुनिल गोवर्धन राठोड (वय ३५) यांचा 5 डिसेंबर रोजी रात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. बुऱ्हाणपूर येथून दुचाकी दुरूस्ती करून ते रात्री ८.३० वाजता घरी परतत असताना पूर्णाड फाट्याजवळ हा अपघात झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या सुनिलला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेल्यावर मृत घोषित करण्यात आले. त्याच्या पश्चात पत्नी रंजना, दोन मुले, एक मुलगी आणि आई उखीबाई आहेत. पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.