वडनेर भोलजी : बकऱ्या
चारण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विश्वगंगा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुर्टी येथे १८ ऑक्टोबर रोजी घडली.
बुर्टी येथील महादेव एकनाथ बोचरे यांचा मुलगा सुमित महादेव बोचरे वय १८ नदीच्या काठाशी बकऱ्या चारण्यासाठी गेला होता. बकऱ्यांचे पाणी पिणे झाल्यानंतर सुमित बकऱ्या हाकलण्यासाठी गेला असता त्याचा पाय घसरून बुडाला. तिथे आजूबाजूला कोणीही नव्हते. त्याने स्वतःला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण ते कोणाच्याही नजरेस आले नाही वतो पाण्यात बुडून गेला. त्याच्या बकऱ्या शेजारच्या शेतात गेल्यानंतर लक्षात आले तर त्यांच्या आई वडील त्याला शोधू लागली त्यावेळेस नदीपात्रात एका ठिकाणी त्याची चप्पल पाण्यावरती तरंगलेली दिसली व त्याच्या आई-वडिलांना शंका आल्यामुळे त्यांनी गावातील लोकांना बोलावून आणले आणि सुमितची शोधा शोध चालू झाली. सुमित सापडला परंतु वेळ भरपूर होऊन गेला होता. सुमितला बाहेर काढल्यानंतर त्याने उलटी केली. नंतर त्याला मलकापूरला हॉस्पिटल मध्ये हलवण्यात आले. तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी
त्याला मृत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण बुर्टी गाव व परिसरात शोककळा पसरली आहे.