Headlines

घर बांधकामासाठी पैसे आणण्यासाठी विवाहितेचा दोन वर्ष छळ; सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा

मोताळा: हुंड्यासाठी एका २६ वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आल्याची घटना दि. १० जानेवारी २०२२ ते २ एप्रिल २०२४ दरम्यान चिखली तालुक्यातील किन्होळा येथे घडली. याप्रकरणी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील राजूर येथील कविता देविदास खरात या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, पती देविदास जयसिंग खरात, सासू निर्मला जयसिंग खरात, जेठ गजानन जयसिंग खरात (सर्व रा. किन्होळा) नणंद सुनीता राजू डोंगरे (रा. अंढेरा), अनिता विनोद बिबे (रा. बुलढाणा) या सासरच्या मंडळींनी घर बांधण्यासाठी माहेरून तीन लाख रुपये घेऊन ये, असा फिर्यादीस तगादा लावला. फिर्यादीने माहेरून पैसे आणण्यासाठी नकार दिला असता १० जानेवारी २०२२ ते २ एप्रिल २०२४ दरम्यान फिर्यादीस शारीरिक व मानसिक त्रास देऊन मारहाण करीत शिवीगाळ केली तसेच घरातून बाहेर हाकलून दिले व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यावरून बोराखेडी पोलिसांनी सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास नायक पोलिस कॉन्स्टेबल अमोल खराडे, पोलिस कॉन्स्टेबल प्रमोद साळोक हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!