धोबी समाजाच्या आरक्षणासाठी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन!
मलकापूर 🙁 विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) धोबी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभरातून एकच मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रसंत गाडगे महाराज धोबी परीट सेवा मंडळ, मलकापूर शहर व तालुक्याच्या वतीने तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. धोबी समाजावर आरक्षणाच्या बाबतीत होणारा अन्याय तातडीने दूर करून समाजाला न्याय द्यावा ही मागणी यावेळी करण्यात आली….
