खामगावच्या एमआयडीसीतील दोन कंपनीत चोरी; अडीच लाखांची रोकड लंपास, चोरीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद..

खामगाव :- एमआयडीसीत १२ डिसेंबरच्या मध्यरात्री दोन वेगवेगळ्या उद्योगांमध्ये चोरीची घटना घडली. समृद्धी इंडस्ट्रीज आणि चिराऊ पावर प्रा. लि. या कार्यालयांमधून अज्ञात चोरट्यांनी एकूण अडीच लाख रुपयांची रोख रक्कम लंपास केली आहे.प्राथमिक माहितीनुसार, मध्यरात्री १२.३० ते २.३० वाजेदरम्यान ही चोरीची घटना घडली. समृद्धी इंडस्ट्रीजच्या कार्यालयातून सुमारे १ लाख रुपयांची रोख तर चिराऊ पावर प्रा. लि.च्या…

Read More

नदीपात्रात आढळला 40 वर्षीय महिलेचा मृतदेह, खामगाव तालुक्यातील घटना!

  खामगाव : तोरणा नदीच्या पात्रात एका 40 वर्षीय महिलेचा मृतदेह सापडल्याची घटना उघडकीस आली आहे. मृत महिलेचे नाव सरला राजू पांढरे असे आहे. त्या गावाजवळच्या तलावात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. 12 डिसेंबर रोजी सकाळपासून त्या बेपत्ता होत्या. त्यांचा मृतदेह स्थानिक लोकांना नदीच्या पात्रात आढळून आला. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी पोलिसांना कळवले. पोलीसांनी पंचनामा करून…

Read More

स्कूल बस व दुचाकीची धडक, २१ वर्षीय युवक ठार

बुलढाणा:- तालुक्यातील खुपगाव येथील २१ वर्षीय जीवन मुकुंदा इंगळे याचा एका भीषण अपघातात मृत्यू झाला. ही घटना ११ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास बुलढाणा शहराजवळील आश्रम शाळेजवळ घडली. जीवन इंगळे हे बुलढाणा येथील एका हेअर सलून मध्ये काम करत होते. बुधवारी सकाळी ते दुचाकीने कामावर जात होते, त्याचवेळी शिवसाई ज्ञानपीठ शाळेची बस साखळीकडे जात…

Read More

अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने महसूल पथकाला केली धक्काबुक्की; बोरखेडी पोलिसात गुन्हा दाखल!

मोताळा :- येथील शिवारात १० डिसेंबर रोजी अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकाला एक ट्रॅक्टर चालक धक्काबुक्की करून ट्रॅक्टर घेऊन पलायन झाला. संबंधित ट्रॅक्टर चालकाने महसूल पथकाला परवाना न दाखवता वाळूची वाहतूक करताना पकडले गेले, परंतु त्याने कारवाईला विरोध करत महसूल पथकावर शारीरिक हल्ला केला. या प्रकरणी बोराखेडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

Read More

मविआला हादरा बसणार: शिवसेना, भाजपाच्या संपर्कात महाविकास आघाडीचे आमदार-खासदार?

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. महायुती सरकार स्थापन होऊन आठवडा झाला असला तरी मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडल्याने सत्ताधारी आघाडीत रस्सीखेच सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्याचवेळी महाविकास आघाडीतील काही नेते भाजपाच्या संपर्कात असल्याचा दावा करून राजकीय वातावरण अधिक तापवण्यात आले आहे. संजय शिरसाट यांचा दावा शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट…

Read More

डिडोळा बु येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी राज्यस्तरीय स्काऊट शिबिरासाठी पात्र

डिडोळा, मोताळा: महाराष्ट्र शासनांतर्गत भारत स्काऊट राज्यस्तरीय राज्य पुरस्कार चाचणी शिबिराचे आयोजन 2 ते 5 डिसेंबर 2024 या कालावधीत संभाजीनगर येथे करण्यात आले. या शिबिरात सहा जिल्ह्यांतील 140 स्काऊट विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून बुलढाणा जिल्ह्यातून 33 विद्यार्थी सहभागी झाले.डिडोळा बु येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांनी या शिबिरासाठी पात्रता मिळवली. सम्राट सुधाकर गाडेकर, रितेश भगवान…

Read More

तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन संपवली जीवन यात्रा!

मंगरुळ नवघरे :- येथील तरुण गोविंद सुरेश गायकवाड वय २६ वर्ष रा. मंगरूळ नवघरे हा बाबुळगाव शिवारांमधील त्याच्या शेताला लागून असलेल्या आंब्याच्या झाडाला गळफास घेतल्याचे सकाळी १० वाजताच्या उघडकीस आले. येथील शेतकरी संतोष छगन वाकडे हा सकाळी शेतामध्ये चक्कर मारत असताना एका आंब्याच्या झाडाला गोविंद गायकवाड हा गळफास घेऊन दिसून आल्यानंतर त्यांनी मंगरूळ येथील दीपक…

Read More

अवैध गुटख्याची वाहतूक करणारे पिकअप वाहन पकडले, ३६.८२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त; बोराखेडी पोलिसांची कारवाई!

मोताळा : महिंद्रा बोलेरो पिकअप क्र. एम एच २८ बीबी ७४९१ हा संशयित वाहन खामगाववरून मोताळा येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर बोराखेडी पोलिसांनी तातडीने नाकाबंदी केली. पोलिसांनी बोराखेडी फाटा येथे वाहन थांबवून त्याची तपासणी केली असता, वाहनामध्ये महाराष्ट्र राज्य शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा आढळून आला.या कारवाईत २५,८२,००० रुपये किमतीचा गुटखा आणि पिकअप वाहनाची किमत ११,००,००० रुपये…

Read More

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, अपघातात शिक्षक गंभीर जखमी; अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल!

खामगाव :- टाकळी फाटा येथील रस्त्यावर एक दुर्दैवी अपघात घडला असून, त्यात शिक्षक मोहन त्र्यंबक सालवे गंभीर जखमी झाले आहेत. शाळेतून घरी जात असताना समोरून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला, ज्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे.धडक दिलेल्या वाहनाचा क्रमांक एम. एच. १२ जीएफ ४४३९ असल्याचे…

Read More

ट्रकची दुचाकीला धडक, एक ठार, एक जखमी; मलकापूर शहरातील घटना!

मलकापूर :- आज, दि.10 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास मलकापूर शहरातील मुंधळा पेट्रोल पंपाजवळ रस्त्याच्या वळणावर ट्रकने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील अजय रत्नाकांत पाटील (वय 37, रा. पारोळा, जिल्हा जळगाव) यांचा मृत्यू झाला, तर प्रसाद भटू (वय 46, रा. पारोळा, जिल्हा जळगाव) हे जखमी झाले.दोघेही मलकापूर येथे धान्य खरेदी…

Read More
error: Content is protected !!