“पोलीस फक्त रक्षकच नव्हे, तर माणुसकीचे प्रतीकही!” मलकापूर ग्रामीणचे ठाणेदार संदीप काळे यांचा थंडीतील माणुसकीचा दीप: बेघरांना दिला उबदार आधार

मलकापूर( दिपक इटणारे ):- कडाक्याच्या थंडीत अनेकांच्या अंगावर शाल असते, पण काहीजणांना उबही मिळत नाही. अशा परिस्थितीत मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माणुसकीचा झरा जागवला. पेट्रोलिंगच्या दरम्यान रस्त्यावर उघड्यावर झोपलेली बेघर चिमुकली मुले आणि वृद्ध त्यांना दिसले. थंडीने गारठलेल्या या व्यक्तींकडे स्वत:ला उब देण्यासाठी कोणताच आधार नव्हता. ही हृदयस्पर्शी…

Read More

“चोराच्या पावलांना शेजाऱ्याच्या कानांची धार, चोरट्यास रंगेहाथ पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात; शेगांव येथील घटना!

शेगाव :- शहरातील वार्ड क्रमांक २ मधील ओम नगरमध्ये १७ डिसेंबरच्या मध्यरात्री चोरीच्या प्रयत्नाचा थरार उघडकीस आला. रात्री २.३० वाजताच्या सुमारास “चोर-चोर” असा गोंगाट ऐकून सुनिल जगन्नाथ ठोंबरे हे घराबाहेर आले. यावेळी त्यांनी पाहिले की, त्यांचे जावई दिगांबर संपतराव हाके यांच्या घरात चोरटा शिरलेला आहे.चोरट्याने घरातील आलमारी उघडून एका बॅगेत कपडे भरत असताना त्याला ठोंबरे…

Read More

आयशर ट्रकच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू; मलकापूर शहरातील घटना!

  मलकापूर :- शहरातील पंचमुखी हनुमान मंदिराजवळ आज, 18 डिसेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजताच्या सुमारास एक अपघाताची घटना घडली. एचडीएफसी बँकेसमोर घडलेल्या या दुर्घटनेत, मालवाहू आयशर ट्रकने निष्काळजीपणे व भरधाव वेगाने सायकलस्वाराला धडक दिली.या अपघातात सईद अहमद अब्दुल कादर (वय 60, रा. माळीपुरा, मलकापूर) यांचा मृत्यू झाला आहे. शहर पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत आयशर…

Read More

मलकापूरात चोरट्यांचा धुमाकूळ; घरासमोर उभ्या असलेल्या चार चाकीचे स्टेपनी चोरण्याचा प्रयत्न

  मलकापूर : शहरात चोऱ्यांच्या घटनांनी उग्र स्वरूप धारण केले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून मलकापूर शहरात चोरीच्या घटना सातत्याने वाढत आहेत. नुकत्याच घडलेल्या घटनेने या समस्येचे गांभीर्य अधोरेखित केले आहे.17 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास आदर्शनगर भागात चोरट्यांनी घरासमोर उभ्या असलेल्या चार चाकी वाहनाचा स्टेपनी चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरट्यांचा…

Read More

कोलते इंजिनिअरिंग मध्ये एनसीसी कॅडेट्स आणि पालकांचा सन्मान सोहळा

मलकापूर – पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, मलकापूरच्या एनसीसी युनिटने अमरावती विभागातील आयडिया आणि इनोव्हेशन स्पर्धेत सर्वोत्तम प्रकल्पांसाठी मिळवलेल्या यशाचा गौरव करण्यासाठी भव्य सन्मान सोहळ्याचे आयोजन केले. या कार्यक्रमाने केवळ कॅडेट्सच नव्हे, तर त्यांचे मार्गदर्शक आणि पालकांसाठीही प्रेरणादायी क्षण निर्माण केला. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली….

Read More

दिवसा ढवळ्या दरोडा; मुक्ताईनगर तालुक्यातील व्यापाऱ्यांकडून लाखोंचे दागदागिने लुटले, जळगाव जामोद तालुक्यातील घटना!

  जळगाव. जा :- मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा येथील सराफा व्यापारी स्वप्नील करे आणि मधुकर लुले यांच्यावर धानोरा-पळशी मार्गावर १७ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता अज्ञात दरोडेखोरांनी हल्ला केला. त्यांनी व्यापाऱ्यांकडून सुमारे ८ किलो चांदी, १०० ग्रॅम सोने आणि रोख रक्कम मिळून एकूण १५ लाखांचा ऐवज लुटला. व्यापारी व्यवहारासाठी आसलगाव येथील सराफा बाजारात जात असताना ही…

Read More

दर्शनाला जात असतांना समृद्धी महामार्गावर अपघात; टायर फुटल्याने कार पलटी, एकाचा मृत्यू, तीन जण जखमी!

मेहकर : – नाशिकहून शेगाव येथे श्री संत गजानन महाराज यांच्या समाधी दर्शनाला जाणाऱ्या खुळे कुटुंबीयांच्या कारला भीषण अपघात झाला. समृद्धी महामार्गावर टोल क्रमांक २९१ जवळ गाडीचे टायर फुटल्याने नियंत्रण सुटून हा अपघात झाला. या अपघातात महेश खुळे (वय ४४) गंभीर जखमी झाले. उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. तसेच दीपाली…

Read More

अवैध रेती वाहतूक प्रकरणी ट्रॅक्टर जप्त; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल! जलंब पोलिसांची कारवाई

खामगाव : – अंबोडा नदीपात्रातून विनापरवाना अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर जलंब पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान कारवाई केली. ही घटना रविवारी (दि. 15) दुपारी 12.30 वाजता खोलखेड माटरगाव चौफुलीवर घडली. ट्रॅक्टर चालक सुरज कैलासिंग राजपूत (वय 33, रा. खोलखेड) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांना अंबोडा नदीपात्रातून अवैध रेती वाहतुकीची माहिती मिळताच जलंब पोलीस ठाण्याचे…

Read More

बिबट्याच्या हल्लात शेतकरी गंभीर जखमी, आरडाओरड केल्याने शेतकऱ्याचा जीव वाचला; मोताळा तालुक्यातील घटना!

  मोताळा :- तालुक्यातील रोहिणखेड शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात ३२ वर्षीय शेतकरी जखमी झाल्याची घटना सोमवारी, १६ डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. जखमी शेतकऱ्याला तातडीने जिल्हा रुग्णालय, बुलढाणा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.रवि रमेश निंबोळकर (वय ३२) हे सकाळी शेतात जाण्यासाठी दुचाकीने गट क्र. २४१ दाभा रस्त्याने जात असताना अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला…

Read More

बांगलादेश मधील हिंदू बांधवांवर होणाऱ्या अत्याचारा विरुद्ध मलकापूर मधील हजारो हिंदु उतरले रस्त्यावर भारत सरकारने युनिस्को वर दबाव आणून अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचार थांबवावे गृहमंत्री यांच्याकडे मागणी

  मलकापूर (प्रतिनिधी): बांगलादेशातील हिंदू, जैन, बौद्ध समाजावर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ मलकापूरमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने १५ डिसेंबर रोजी मूक मोर्चा काढण्यात आला. गोविंद विष्णू महाजन विद्यालयापासून तहसील कार्यालयापर्यंत काढलेल्या या मोर्चात हजारोंची उपस्थिती होती.या मोर्चादरम्यान तहसीलदारांना निवेदन देण्यात आले, ज्यात भारत सरकारने जागतिक मानवाधिकार संघटनांवर दबाव टाकून अत्याचार थांबवण्याची आणि इस्कॉन मंदिराचे संत स्वामी…

Read More
error: Content is protected !!