मलकापूर तालुक्याचा दहावीचा निकाल ९३.८६ टक्के; तालुक्यातील चार विद्यालयांचा निकाल शंभर टक्के

मलकापूर:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल आज १३ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला. मलकापूर तालुक्याचा निकाल ९३.८६ टक्के लागला असल्याची माहिती गट शिक्षणाधिकारी एन. जे. फाळके यांनी दिली. तालुक्यातील विविध शाळांचा निकाल पुढीलप्रमाणे आहे ग्रामीण विकास विद्यालय बेलाड – १००% भारत भारती कॉन्व्हेंट – १००%…

Read More

मलकापूरचा अभिमान उजळला : माजी नगराध्यक्ष नारायणदास निहलानी यांना ‘राज भूषण’ पुरस्काराने गौरव “हा सन्मान माझा नाही, मलकापूरकरांचा आहे” — निहलानी यांचा भावूक संदेश

मलकापूर ( दिपक इटणारे ) :- शहराच्या राजकारणात, विकासात आणि सामाजिक जडणघडणीत अमूल्य योगदान देणाऱ्या मलकापूर शहराचे माजी नगराध्यक्ष नारायणदास निहलानी यांना ‘राज भूषण’ हा राज्यस्तरीय प्रतिष्ठेचा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. हा सन्मान 10 मे रोजी नागपूर येथील एका भव्य कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी कृषिमंत्री आमदार अनिल बोंडे यांच्या शुभहस्ते प्रदान…

Read More

गल्लीतही सुरक्षितता नाही! मलकापूरच्या नंदनवन नगरात सायंकाळच्या वेळेस महिलेला लक्ष्य करत अज्ञात चोरट्यांनी सोनसाखळी हिसकावली; घटनेचा थरारक व्हिडीओ व्हायरल ?

मलकापूर :- शहरातील नंदनवन नगर येथे 9 मे रोजी सायंकाळी अंदाजे 8 वाजता दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्याने एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली. विशेष म्हणजे ही चोरी दिनदहाडे, लोकवस्तीत घडली असून, संबंधित घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नंदनवन नगर परिसरात दोन महिला…

Read More

गोपालकृष्ण नगरातील रस्त्यांची दुर्दशा; उघड्या आसऱ्यामुळे अपघात, अपघातात चिमुकली जखमी, नागरिक संतप्त!

  मलकापूर :- ( उमेश इटणारे ) शहरातील गोपालकृष्ण नगर परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. रस्त्यावरील खड्डे नव्हेच, तर उखडलेल्या व सतत उघड्या पडलेल्या जलनिस्सारणाच्या आसाऱ्यांमुळे या भागात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याच अक्षम्य दुर्लक्षामुळे आज (९ मे) संध्याकाळी एका शिक्षकाच्या मुलीला दुखापत होण्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शिक्षक…

Read More

वादळाच्या झटक्यात बोरसे कुटुंबाचे 3 लाखांचे नुकसान; वर्षभराचा शेतमाल आगीत खाक

मलकापूर (देवधाबा):- ज्याच्या घामातून पीक उगवतं, त्याच्या स्वप्नांना आगीचा झटका बसतो, तेव्हा नुसता धूर उडत नाही, तर मनही होरपळून निघतं. दि. 5 मे 2025 रोजी रात्रीच्या सुमारास आलेल्या वीज वादळी वाऱ्यामुळे देवधाबा शिवारातील गट क्रमांक 355 मध्ये असलेल्या शेतकरी नारायण रघुनाथ बोरसे यांच्या गोदामाला अचानक आग लागली. या आगीत गोदामात साठवलेला तुर, गहू, तुरीचे कुटार,…

Read More

“प्रशासनाचा खुर्चीत आराम, पण रस्त्यावर जनतेचा हाहाकार!” – मलकापूरमध्ये नगर परिषदेच्या कारभारावर काँग्रेसचा हल्लाबोल

  मलकापूर:- रोजंदारीने जगणाऱ्या सामान्य नागरिकांचे पाणी, आरोग्य, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांसाठीचे जगणे अक्षरशः असह्य झाले असताना मलकापूर नगर परिषदेचा प्रशासन मात्र समाधानाच्या झोपी गेलेला आहे. त्याच प्रशासनाला जाग आणण्यासाठी काँग्रेस पक्षाने आक्रमक पवित्रा घेत बुधवारी निवेदनाच्या माध्यमातून तीव्र नाराजी व्यक्त केली. आमदार राजेश एकडे यांच्या आदेशावरून व ज्येष्ठ नेते डॉ. अरविंद कोलते, श्यामभाऊ राठी,…

Read More

‘स्वच्छ भारत केवळ पोस्टरवरच’ या बातमीचा दणका – कुलमखेल परिसरातील घाणीच्या साम्राज्याची बातमी फ्लॅश अन् कचरा साफ

  मलकापूर (दीपक इटणारे) – “विदर्भ लाइव्हने ” काल प्रकाशित केलेल्या ‘स्वच्छ भारत केवळ पोस्टरवरच – कुलमखेल परिसरात घाणीचे साम्राज्य’ या बातमीचा थेट परिणाम आज दिसून आला. नगरपरिषद प्रशासनाने कुलमखेल परिसरात तातडीने स्वच्छता मोहीम राबवत कचऱ्याचे ढीग हटवले. रहिवाशांनी यावेळी समाधान व्यक्त करत “माध्यमांनी आवाज उठवल्यानेच हा बदल घडला” अशी प्रतिक्रिया दिली. मंदिर परिसर, मुख्य…

Read More

स्वच्छ भारत केवळ पोस्टरवरच – कुलमखेल परिसरात घाणीचे साम्राज्य, नागरिक त्रस्त; प्रशासन धृतराष्ट्राच्या सोंगेत

  मलकापूर – “स्वच्छ भारत, सुंदर भारत” ही केंद्र सरकारची घोषणा प्रत्यक्षात केवळ पोस्टर आणि भाषणांपुरती मर्यादित राहिल्याचे विदारक चित्र मलकापूर शहरातील कुलमखेल परिसरात पाहायला मिळत आहे. या भागात रस्त्याच्या दुतर्फा कचऱ्याचे ढीग, दुर्गंधी आणि मोकाट जनावरांचा वावर असल्याने स्थानिकांचे जीवनमान थेट धोक्यात आले आहे. दररोज सडलेल्या अन्नपदार्थांचा वास, प्लास्टिकच्या पिशव्या, औषधींचा कचरा आणि नाल्यांतील…

Read More

नूतन विद्यालयातील दोन शिक्षक निलंबित — गंभीर गुन्ह्यात अटकेनंतर शिक्षण विभागाची तातडीची कारवाई

मलकापूर::- शिक्षण क्षेत्रातील जबाबदारीच्या भूमिकेत असताना अनैतिक व बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभाग आल्यास कायदेशीर कार्यवाही अटळ ठरते, याचे उदाहरण मलकापूरच्या नूतन माध्यमिक व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात घडलेल्या घटनेतून समोर आले आहे. सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले श्री. समाधान आत्माराम इंगळे व श्री. अनिल नीना थाटे या दोघांना एका गंभीर गुन्हेगारी प्रकरणात अटक झाल्याने त्यांचे निलंबन करण्यात…

Read More

“आम्ही फ्लॅट खाली करणार नाही, जर बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, तर तुमच्या नवऱ्याला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवू; जातीवाचक शिवीगाळ व धमकी प्रकरणी महिलेसह एका विरुद्ध अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल; मलकापूर शहरातील घटना

मलकापूर: मालमत्तेच्या वादातून वैयक्तिक राग व्यक्त करत एक महिलेला जातीवाचक शिवीगाळ करत अपमानित करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मलकापूर शहरात उघडकीस आला आहे. एवढ्यावरच न थांबता, संबंधित महिलेला तिच्या पतीविरुद्ध खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संबंधित आरोपी महिला व एका अनोळखी व्यक्तीवर अ‍ॅट्रासिटीसह गंभीर गुन्हे दाखल करण्यात…

Read More
error: Content is protected !!