मलकापूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा उद्रेक – आर.सी.सी. भिंतीमुळे त्रस्त नागरिक, गेट व बुकिंग विंडोची मागणी; अन्यथा रेल रोको आंदोलन करू – अशांत भाई वानखेडे
मलकापूर : मलकापूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्र. २ च्या बाजूला उभारण्यात आलेल्या आर.सी.सी. भिंतीमुळे प्रवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. स्थानकात प्रवेश मिळविण्यासाठी नागरिकांना तब्बल दोन किलोमीटरचा फेरा मारावा लागत असल्याने प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पंतनगर, एकतानगर, हाश्मी नगर, कुंड खुर्द, भालेगाव, देवधाबा, धरणगाव, नरवेल, म्हैसवाडी, अनुरावाद, झोडगा, धुपेश्वर, दसरखेड, तालसवाडा, रुईखेड, तिघरा,…
