उधारी पंखा न दिल्याने मारहाण, दोघांवर गुन्हा! लाखनवाडा येथील घटना

खामगावः छताचा पंखा उधारीवर न दिल्याच्या संतापातून एकाने मारहाण केल्याची घटना हिवरखेड पोलिस स्टेशन अंतर्गत लाखनवाडा येथे बु. येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार, पवन भागवत उमाळे हा लाखनवाडा बु. येथील दुकानात होता. त्यावेळी प्रकाश उर्फ बालू सुरेश देशमुख हा दुकानात आला. त्याने पंखा उधारीवर मागितला. त्यावेळी पवन याने पंखा देण्यास…

Read More

विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या गणेश भक्तांच्या दुचाकींवर चोरट्यांची काळी नजर.. गांधी चौकातून तीन दुचाकींची चोरी!

खामगावःगणपती विसर्जनाच्या दिवशी स्थानिक गांधी चौक भागातून तीन दुचाक्या लंपास झाल्याची घटना उघडकीस आली आहे. गणपती विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी तालुकाभरातून नागरिक खामगावला येत असतात. जागा मिळेल तेथे दुचाक्या लावून लोक मेनरोडवर मिरवणूक पाहण्यासाठी जातात.अशाच प्रकारे १७ सप्टेंबर रोजी काहीजण गांधीचौक परिसरात दुचाक्या उभ्या करुन मिरवणूक पाहण्यासाठी गेले होते. ही संधी साधून अज्ञात चोरटयांनी जयहिंद इलेक्ट्रीकल्स…

Read More

खोटी बतावणी करून वयोवृद्ध इसमाच्या हातातील अंगुठी लंपास करणाऱ्या भामट्या चोराला खामगाव पोलिसांकडून अटक!

  खामगावः खोटी बतावणी करून वयोवृद्ध इसमाच्या हातातील अंगुठी पळविणाऱ्या एका भामट्यास शहर पोलिसांनी बुधवारी अटक केली. डिगांबर कौतिक मानकरे (५१) रा. जळगाव खान्देश असे या भामट्याचे नाव आहे. त्याला शहर पोलिसांनी नांदुरा रोडवरून अटक केली.प्राप्त माहितीनुसार, खामगाव शहर पोलिस स्टेशन हद्दीत काही दिवसांपूर्वी एका वयोवृद्ध नागरिकाला खोटी बतावणी करुन त्यांच्या हातातील सोन्याच्या दोन अंगठ्या…

Read More

कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला वीट मारून केले जखमी, युवका विरुद्ध गुन्हा! खामगाव येथील घटना

  खामगाव:- कर्तव्य बजावत असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याशी युवकाने वाद घातला. वाद विकोपाला गेल्यानंतर युवकाने अधिकाऱ्याला वीट मारून जखमी केले. याप्रकरणी तक्रारीवरून संशयित युवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, शिवाजीनगर पोलिस स्टेशनआंतर्गत एएसआय अनिल जगन्नाथ भगत (५६) यांची निर्मल टर्निंग पॉइंटवर ड्यूटी लागलेली होती त्यावेळी भगत कर्तव्य बजावत असताना सतीफैलातील विशाल ऊर्फ धम्मा देवनारायण…

Read More

खेळतांना पुलावरून पडल्याने सात वर्षीय चिमुकल्याचा पाण्यात बुडून मृत्यू, खामगाव तालुक्यातील घटना

खामगाव : खेळता खेळता पुलावरून पडल्याने एका सात वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना खामगाव तालुक्यातील कारेगाव येथे बुधवारी दुपारी घडली. या घटनेमुळे कारेगाव गावात एकच शोककळा पसरली आहे. प्राप्त माहितीनुसार, कारेगाव येथील इयत्ता दुसरीत शिकणारा यश अरुण बोदडे हा चिमुकला खेळण्यासाठी गावानजीक असलेल्या पुलावर गेला. खेळता खेळता तो पाण्यात पडून मोरीत अकडला. त्यामुळे त्याचा पाण्यात…

Read More

खामगाव बस स्थानकात मोबाईल चोरी करणाऱ्या झारखंड येथील सराईत चोरट्यास अटक,42 हजाराचा मुद्देमाल जप्त, खामगाव पोलिसांची कारवाई!

खामगाव : स्थानिक शहर पोस्टेला तक्रारीवरुन मोबाईल चोरीच्या गुन्ह्याची नोंद असलेल्या घटनेतील झारखंड येथील मोबाईल चोरट्यास ७ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गोपाल सुरेशराव पवार वय ३९ रा. खडकी अकोला यांनी ७ सप्टेंबर रोजी शहर पोस्टेला फिर्याद दिली की मी शहरात कामानिमित्त आलो होतो. दरम्या येथील बसस्थानक येथे माझा मोबाईल किंमत ७ हजार…

Read More

ब्युटी पार्लर मध्ये घुसून महिनलेचा विनयभंग,आरोपीला अटक, खामगाव शहरातील घटना!

खामगाव :- ब्युटी पार्लर चालवणाऱ्या एका महिलेचा ब्युटी पार्लर मध्ये घूसून विनयभंग करण्यात आल्याची घटना खामगाव शहरात घडली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी गोपाल दुतोंडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील पीडित महिला ४० वर्षांची आहे. महिलेचे खामगाव शहरात ब्युटी पार्लर आहे. या…

Read More

पिशवी कापून महिलेच्या पाकिटातील रोख रक्कम व दाग दागिने लंपास! अज्ञात चोरट्याविरुद्ध खामगाव पोलिसात गुन्हा दाखल!

खामगावः स्थानिक मुख्य रस्त्यावर खरेदीसाठी आलेल्या एका महिलेची पिशवी कापून पाकीट लंपास करण्यात आले. तक्रारीनुसार, अकोला येथील आशा गजानन ददगाळ या महिलेने बुधवारी खामगाव शहरातील मुख्य रस्त्यावरील एका सराफा व्यावसायिकाकडून सोन्याचे दोन मंगळसूत्र आणि चार मणी खरेदी केले. खरेदी केलेले सोने एका पिशवीतील पाकिटात टाकले. दरम्यान, अज्ञात चोरट्याने त्यांची पिशवी कापून पाकिटातील रोख ५०० रुपये…

Read More

चिमुकल्यांना कमरेला बांधून मातेची तलावात उडी घेऊन आत्महत्या, खामगाव तालुक्यातील घटना

वृत्तसेवा खामगाव : पोटच्या दोन चिमुरड्यांना कमरेला बांधून पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेने तालुक्यातील पिंप्री गवळी शिवारातील पाझर तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना २६ ऑगस्ट रोजी उघडकीस आली आहे. याबाबत खामगाव ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. सदर महिलेने कोणत्या कारणामुळे हे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले याबाबत तर्कवितर्क व्यक्त होत आहे. दहिगाव गावंडे…

Read More

ऑटोत महिलेच्या शेजारी बसलेल्या महिलेने पर्समधून ४८०० रु केले लंपास, अज्ञात चोरट्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

खामगाव : बस स्थानकापर्यंत जाण्यासाठी ऑटोत बसलेल्या महिलेच्या दुसऱ्या महिलेने पर्समधून अलगदपणे ४८२५ रु. लंपास केल्याची घटना उघडकीस आली. याबाबत सुरेखा संजय बोरकर (४०) रा. नांदुरा यांनी शहर पोस्टेला तक्रार दिली त्यावरून शहर पोस्टेत अज्ञात चोरट्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की त्या सोमवार ५ ऑगस्ट रोजी नांदुरा रोडवरील…

Read More
error: Content is protected !!