ऑटोचा धक्का लागल्याच्या कारणावरून तिघांनी ऑटो चालकाला बदळले,परस्पर तक्रारीवरून गुन्हा दाखल

खामगाव : रस्त्यात उभ्या असलेल्या लोकांना वाचविताना ऑटोचा धक्का लागल्याच्या कारणावरून वाद करीत तिघांनी मारहाण केली. तसेच यावेळी झालेल्या झटापटीत ऑटोचालकाच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याची पोथ आणि मोबाइल लंपास केला. याप्रकरणी तक्रारीवरून भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमान्वये तिघांविरोधात विविध गुन्हे दाखल करण्यात आले. तक्रारीनुसार, शहेबाज खान बाबूखान ३० हा आपल्या परिवारासह एम. एच. २०-ई.एफ.-८११९ ने छत्रपती संभाजीनगर…

Read More

घर बंद करून परिवारासह पुण्याला गेले, संधीचा फायदा घेत चोरट्याने घर साफ केले, 1 लाख 35 हजारांचा मुद्देमाल लंपास.. खामगावची घटना

  खामगाव:- संधीचा फायदा घेत येथील एमआयडीसी भागातील गौरा नगरातील एका बंद घरातून अज्ञात चोरट्यांनी एक लाख ३५ हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना सोमवारी उघडकीस आली. तक्रारीनुसार, प्रदीपकुमार डिगांबर इंगळे (३४) हे परिवारासह पुणे येथे गेले होते. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी इंगळे यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील देवी देवतांच्या…

Read More

पत्नीस शिवीगाळ केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या युवकास मारहाण, सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

खामगावः पत्नीस शिवीगाळ केल्याचा जाब विचारण्यासाठी आलेल्या युवकास सात जणांनी अश्लील शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. ही घटना नांदुरा रोडवरील पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर घडली. तक्रारीनुसार, पवन प्रकाश भगत (३४) रा. सुटाळपुरा यांच्या घरासमोर कपिल गोविंद मिश्रा (३०) हा आला. त्याने पवन भगत याच्या पत्नीस शिवीगाळ केली. त्यानंतर पवन घरी आला असता त्याला पत्नीने याबाबत सांगितले. यावरून…

Read More

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या डोक्यात कुकर घातला,खामगाव येथील घटना

खामगाव : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या पतीविरुद्ध पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.रूपाली शिवाजी बाभूळकर वय (३०) यांनी पोस्टेला फिर्याददिली की ते जुनना येथे पतीसोबत राहतात. रविवारी त्या घरात स्वयंपाक करीत असतांना पतीने चारित्र्यावर संशय घेत तिच्याशी वाद घातला. कुकर डोक्यात मारून जखमी करून जिवे मारण्याची…

Read More

सततची नापिकी, त्यात बँकेचे 70 हजारांचे कर्ज, 50 वर्षीय शेतकऱ्यांने उचलले टोकाचे पाऊल

भालेगाव बाजार : भालेगाव बाजार येथील शेतकरी राजाराम वामन घोडके (वय ५०) या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना ११ जून रोजी घडली. राजाराम वामन घोडके यांनी भारतीय स्टेट बँकेचे ७० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. सततच्या नापिकीमुळे कर्ज फेडणे शक्य न झाल्याने व पुढील पेरणीचे संकट असल्याने त्यांनी विष प्राशन करून जीवनयात्रा संपविली. राजेश घोडके यांचा…

Read More

वीज पडून दोन बैलांचा मृत्यू, खामगाव तालुक्यातील घटना

खामगाव : शेतात बांधून ठेवलेल्या दोन बैलांचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना दि.१० जून रोजी तालुक्यातील बोरी आडगाव ते आंबेटाकळी रोडवर रात्रीच्या सुमारास घडली. १० जून रोजी सायंकाळी ६ वाजतापासून ढगाळ वातावरण तयार झाले होते त्यादरम्यान जोरदार वारा सुटला. त्यानंतर विजांच्या कडकडाटात जोरदार पावसाला सुरूवात झाली जवळपास एक तास पाऊस बरसला. बोरी अडगाव येथील शेख…

Read More

क्लास न लावता कु. दिव्या सुभाष ठोसर हि इयत्ता दहावीच्या परिक्षेत ८९.८० गुण घेऊन झाली उत्तीर्ण

खामगाव :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2024 या वर्षाचा निकाल सोमवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. यात शेलोडी येथील जागृती ज्ञानपीठची विद्यार्थीनी, पिंप्राळा येथील रहिवासी कु. दिव्या सुभाष ठोसर हिने इयत्ता दहावीच्या परिक्षेत ८९.८० टक्के गुण घेवून उत्तीर्ण झाली आहे. दिव्या ही ग्रामीण भागातील असून तिला कोणतेही क्लास न…

Read More

कर्जाच्या चिंतेतून 73 वर्षीय शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, खामगाव तालुक्यातील घटना

खामगाव :कर्जाच्या चिंतेतून ७३ वर्षीय शेतकऱ्याने गळफास लावून जीवनयात्रा संपवली ही घटना तालुक्यातील कदमापूर येथे २३ मे रोजी उघडकीस आली. नारायण मुकाजी गुरव यांनी २३ मे रोजी पहाटे घरासमोर टिनपत्राच्या लाकडाला दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली. काही वेळाने ही घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा…

Read More

मद्यप्राशन करून आलेल्या मुलाने शेतीच्या वादातून जन्मदात्याचे डोके फोडले ! खामगाव तालुक्यातील घटना

खामगावः पिता-पुत्रांतील शेतीचा वाद विकोपाला गेल्याने पुत्राने वडिलांचे डोके फोडले. ही घटना गुरुवारी रात्री खामगाव तालुक्यातील मांडका येथे घडली. तक्रारीनुसार, सुभाष श्रीराम सातव (६५) गुरुवारी रात्री घरी असताना, त्यांचा गणेश नामक मुलगा मद्य प्राशन करून घरी आला. शेतीच्या हिश्श्याची मागणी करून अश्लील शिवीगाळ करायला लागला. वाद नको, म्हणून सकाळी या विषयावर बोलू असले म्हटले असता,…

Read More

मित्रांसोबत विहिरीवर आंघोळीसाठी गेलेल्या 23 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू,खामगाव तालुक्यातील घटना

खामगाव : मित्रांसमवेत विहिरीवर अंघोळीसाठी गेलेल्या 23 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना खामगाव तालुक्यातील वझर येथे मंगळवारी उघडकीस आली. प्राप्त माहितीनुसार, विकास शंकर वाकोडे (२३) हा युवक गावातील काही मुलांसोबत शासकीय पिण्याच्या पाण्याच्या विहिरीवर अंघोळीसाठी गेला. दरम्यान, विहिरीत बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी ५ ते मंगळवारी सकाळी ९…

Read More
error: Content is protected !!