बँकेच्या कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल!
खामगावः तालुक्यातील गणेशपूर येथे बँकेच्या कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी आठ वाजता उघडकीस आली. मृत शेतकऱ्याचे नाव राजू कचरू मोरे (४८) असे आहे. यासंदर्भात गावातील मगन कचरू मोरे यांनी हिवरखेड पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यानुसार, राजू मोरे यांच्यावर गणेशपूर येथील ग्रामीण कोकण बँकेचे ६० हजार रुपये कर्ज थकीत होते. यावर्षी पिकाचे उत्पन्न समाधानकारक…
