Headlines

vidharbh

कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी माजी आमदार संचेतीसह 8 जण व 15 ते 20 खाजगी अंगरक्षक अश्या 29 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मलकापूर:- सभेच्या पूर्वीच हाय होल्टेज ड्रामा, पोलिसांसोबत बाचाबाची, बाजार समिती प्रवेशद्वार समोर घोषणाबाजी, जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी माजी आमदार संचेतीसह 8 जणांवर व 15 ते 20 खाजगी अंगरक्ष अश्या 29 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे की बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर घोषणाबाजी करून कायद्याचे उल्लंघन केले. तसेच पोलिसांनी शांततेच्या आवाहन…

Read More

मलकापूरकरांनो पाणी जपून वापरा, पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी दहा दिवसांचा लागू शकतो कालावधी, वीजपुरवठा खंडित झाल्याने मलकापूरकरांवर जल संकट

मलकापूर (प्रतिनिधी) – पाच दिवसांपूर्वी विजेच्या कडकडाटात वादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी पाण्याची उचल व जलशुध्दीकरण केंद्र प्रभावित झाले आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. परिणामी मलकापूर शहरात पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. जनतेने पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ.आशिष बोबडे यांनी केले आहे. नगर परिषदेच्या धुपेश्वर येथील पंपिंग स्टेशनला…

Read More

संचालकांची गाडी अडवून धक्का बुक्की करून दगडफेक केली, तसेच जमाबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी नऊ जणांसह 150 ते 200 जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल

मलकापूर:- कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या सभापती पदाच्या अविश्वास ठराव मतदान प्रक्रीये दरम्यान नांदुरा रोडवरील जिल्हा मध्यवर्ती केंद्रीय सहकारी पतसंस्था मलकापुर चे समोर गैरकायद्याची मंडळ जमून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन तसेच संचालकांची गाडी अडवून धक्का बुक्की करून दगडफेक केली तसेच या घटनेत तीन पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहे. या प्रकरणी नऊ जणासह 150 ते 200…

Read More

हिराबाई संचेती कन्या शाळेची उज्वल यशाची परंपरा कायम

  मलकापूर :- माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2024 चा निकाल ऑनलाईन जाहीर झाला आहे. या परीक्षेकरिता हिराबाई संचेती कन्या शाळेच्या 82 विद्यार्थिनी प्रविष्ट झाल्या असून त्यापैकी 77 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. शाळेचा निकाल 93.90% लागलेला आहे .प्राविण्यश्रेणीत एकूण 30 , प्रथम श्रेणीत 29 आणि द्वितीय श्रेणीत 18 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत .या परीक्षेत कु….

Read More

कृ.उ.बा.स. च्या सभे पूर्वीच मलकापुरात हाय होल्टेज ड्रामा; पोलिसांवर दगडफेकचा व्हिडीओ व्हायरल

मलकापूर:- मलकापूर (प्रतिनिधी) : मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती भाजपचे शिवचंद्र तायडे यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावावर आज दिनांक ३१ मे रोजी सकाळी ११ वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभे पूर्वीच कार्यकर्त्यांचा प्रचंड गदारोळ बघायला मिळाला. दरम्यान दोन्ही गट समोरासमोर आल्याने प्रचंड नारेबाजी करण्यात आली. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी…

Read More

कृ.उ.बा.स. सभापती शिवचंद्र तायडे यांच्या विरोधात अविश्वास ठराव १३ विरुद्ध २ मताने मंजूर..

  मलकापूर (प्रतिनिधी) : मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती भाजपचे शिवचंद्र तायडे यांचे विरोधात दाखल करण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावावर आज दिनांक ३१ मे रोजी सकाळी ११ वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते प्रचंड गदारोळात १३ विरुद्ध २ मताने शिवचंद्र तायडे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या…

Read More

मलकापूरच्या या परिसरात 144 कलम लागू..मलकापूरचे सभापती यांच्याविरुद्ध उद्या अविश्वास ठराव सभा..

मलकापूर (प्रतिनिधी) – कृषी उत्पन्न बाजार समिती मलकापूरचे सभापती शिवचंद्र तायडे यांचेविरूध्द अविश्वास ठराव पारीत करण्याबाबत सदस्यांनी केलेल्या मागणी अनुषंगाने ३१ मे रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार मलकापूर कार्यालयाचे सभागृहामध्ये सकाळी ११ वाजता विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. सभा कालावधीत कायदा व सुव्यवस्था परिस्थिती कायम राहण्याच्या दृष्टीने तसेच सभा निर्भय व नि:पक्षपातीपणे…

Read More

अंदाधुंदी गोळीबारात माजी नगरसेवकासह एकाचा मृत्यू; भुसावळ शहरातील थरारक घटना

भुसावळ:- भुसावळ येथे अज्ञातांनी अंदाधुंदी गोळीबार करुन माजी नगरसेवकासह एकाचा मृत्यू झाल्याची घटना काल दि. 29 मे रोजी रात्रीच्या सुमारास जुना सातारा परिसरात मरीमाता मंदिर नजीक घडली. या घटनेने पुन्हा एकदा भुसावळ शहर हादरले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहर गोळीबाराच्या घटनेने हादरुन गेले आहे. भुसावळ शहरातील जुना सातारा रोड परिसरातील…

Read More

अल्पवयीन मुलींचा छळ करून पसार झालेल्या आरोपी शिक्षकास पावणे दोन महिन्यानंतर केली अटक

मोताळा : चौथ्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या दोन अल्पवयीन विद्यार्थिनींचा दि. ३ एप्रिल रोजी लैंगिक छळ करून पसार झालेल्या शिक्षकास तब्बल पावणे दोन महिन्यानंतर बुधवारी, दि. २९ बोराखेडी पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका जिल्हा परिषदच्या शाळेत शिक्षक…

Read More

गोठ्यात बांधलेल्या बकऱ्यांवर लांडग्याचा हल्ला, आठ बकऱ्याा ठार,चिखली तालुक्यातील घटना

चिखली:- तालुक्यातील पळसखेड जयंती शेतशिवारातील दिलीप राजाभाऊ खरात यांच्या गोठ्यावर लांडग्याने रात्रीच्या सुमारास हल्ला चढवीत बांधलेल्या आठ बकऱ्यांना ठार केल्याची घटना २९ मे च्या सकाळी उघडकीस आली. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील पळसखेड जयंती शिवारातील गट नं. ११७ मधील दिलीप राजाभाऊ खरात यांनी त्यांच्याकडील आठ बकऱ्या नेहमीप्रमाणे आपल्या गोठ्यात बांधल्या होत्या. २८ मेच्या…

Read More
error: Content is protected !!